मंडलाधिकारी प्रवीण शिंदे यांनी घेतली वाझोली येथील मुलांची शाळा.


वाझोली| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
जि प शाळा वाझोली ता पाटण येथील शाळेमध्ये ढेबेवाडी व कुठरे मंडलाचे मंडलाधिकारी प्रवीण शिंदे यांनी भेट देत शालेय शिक्षणाचा आनंद घेतला. शाळेमध्ये मुलांशी चर्चा करत शिक्षक व मुले यांच्यातील नाते दृढ केले व आपल्या भूतकाळातील शालेय जीवनाची त्यांना या वेळी आठवण झाली शिक्षक व मुले यांचे गुरू-शिष्याचे नाते जपणारा क्षण त्यांनी या वाझोली येथील प्राथमिक शाळेत मुलांच्या बरोबर मनमोकळेपणाने गप्पा मारून त्यांची एक प्रकारे शाळा घेऊनच जोपासला.

 या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वाझोली गावातील जि प शाळा ही काळगाव विभागात येत असून गेल्या वर्षभरात या शाळेने नावलौकिक प्राप्त केला असून शाळेची गुणवत्ता व भौतिक सुविधा तसेच या शाळेत ही विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत असल्याचे त्यांना पहावयास मिळाले. माजी विध्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील (नाना) यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मार्फत शाळेत नवनवीन बदल घडून आल्याचे त्यांना दिसून आले. शाळा व्यवस्थापन समितीचे व त्यांच्या कार्याचे यावेळी मंडलाधिकारी यांनी कौतुक केले. या मुळे शाळेतील लहान मुलांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. या वेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शालेय वस्तु देण्यास सांगितले.  या शाळेस सदैव मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली.        

 या वेळी गावकामगार तलाठी डी जे कोडापे, मा. सरपंच व विद्यमान सदस्य अशोक मोरे, पोलीस पाटील विजय सुतार, मुख्याध्यापक प्रदीप वीर व उपशिक्षक सतीश कोकाटे उपस्थित होते.