काकासाहेब चव्हाण हे पाटण तालुक्यासाठी लाभलेले दुरदृष्टीचे नेतृत्व - प्रतापभाऊ देसाई

 


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

थोर देशभक्त स्वातंत्र्य सेनानी कै.बी.एन तथा काकासाहेब चव्हाण हे पाटण तालुक्यासाठी लाभलेले दुरदृष्टीचे व धडाडीचे नेते होते असे प्रतिपादन पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रतापभाऊ देसाई यांनी व्यक्त केले.

 ते काकासाहेब चव्हाण कॉलेज,तळमावले या ठिकाणी आयोजित काकासाहेब चव्हाण यांच्या ५१ व्या पुण्यस्मरणा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

   यावेळी पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रतापभाऊ देसाई, प्राचार्य आर के भोसले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरूण गाडे, के.सी.कॉलेज,तळमावले विकास समितीचे सदस्य आणि कॉलेजचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुढे देसाई म्हणाले कि काकासाहेब चव्हाण यांच्या ५१ व्या पुण्यस्मरणा निमित्ताने काकांच्या कार्याचा इतिहास व काकांनी केलेल्या राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्रांतीने बदल केला त्या जुन्या गोष्टींचा व आताच्या गोष्टींचा मिलाप घालून विद्यार्थ्यांनी भावी शैक्षणिक ,सामाजिक राजकीय व वाटचालीत कार्य करत असताना काकांचा इतिहास विसरून चालणार नाही असे आवाहन केले.मला घडविण्यात काकांच्या विचांराचा वारसा व वसा महत्त्वाचा आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  महाविद्यालयात १२ फ्रेबुवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी " ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार " हे ब्रीद वाक्य घेऊन पाटण तालुक्यातील वांगखोऱ्यातील कुंभारगावचे सुपूत्र थोर देशभक्त स्वातंत्र्य सेनानी बी.एन.तथा काकासाहेब चव्हाण या दोन्ही समाजसेवकांनी एकमेकांच्या हातात हात घालून व साथ देऊन या वांगखोऱ्यात तळमावले या ठिकाणी प्रथम सन १९५८ साली श्री वाल्मिकी विद्यामंदिर आणि नंतर सन १९६९ साली काकासाहेब चव्हाण कॉलेज या दोन्ही संस्कार क्रेंदाची स्थापना करून , खेडोपाडी,डोंगरी, दुर्गम व भुकंपप्रवण क्षेत्रातील गोरगरीब, दीनदलीत, कष्टकरी शेतकरी आणि माथाडींच्या मुलांच्या करीता शिक्षणाची कवाडे खुले करून इथल्या मुलांच्यात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्रांती केली आणि हा भाग शैक्षणिक दृष्ट्या सुजलाम - सुफलाम करून टाकला.

थोर देशभक्त कै.बी.एन तथा काकासाहेब चव्हाण या महामानवानी केलेल्या सामाजिक,राजकीय, शैक्षणिक प्रगतीचा, परिवर्तनाचा आणि क्रांतीचा कार्याचा पाढा येणाऱ्या विद्यार्थ्यांना काकासाहेब चव्हाण यांचे व्यक्तीमत्व इतिहास समजावा या करिता पुण्यतिथीच्या निमित्ताने दोन्ही संकुलाच्या वतीने संयुक्त विद्यमानाने व्याख्यान व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरूण गाडे यांच्या मार्गदर्शन सांस्कृतिक विभागांतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी के.सी.कॉलेज,तळमावलेचे माजी विद्यार्थी काकासाहेब चव्हाण यांचे नातु व उद्योजक राजेश चव्हाण, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ माने, अँड ए.पी. पाटील, अँड राम होगले, महादेव पानवळ, उपसरपंच अंकुश अतकरी, प्रा. पी आर सावंत, सखाराम माटेकर,पत्रकार श्रीकांत पाटील, प्रा उत्तमराव माने, संपादक प्रदिप माने, अरूण शिबे इ.उपस्थित होते.

  कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व मान्यवर मंडळी यांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजनाने झाली तदनंतर शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे स्वरचित संस्थाप्रार्थना व स्वागतगीत श्री वा.वि.तळमावले यांच्या संगीतमंचानी सादर केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थितांचे स्वागत कॉलेजचे प्राचार्य डॉ अरूण गाडे व श्री मुख्याध्यापक ए बी माने यांनी केले.

 यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री राजाभाऊ माने , अँड ए पी पाटील, अँड राम होगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

   कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर के भोसले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले कि, काकासाहेब चव्हाण यांच्या ५१ व्या पुण्यतिथी निमित्ताने वांग खोरे सुजलाम - सुफलाम होण्यासाठी काकांचे मोठे योगदान आहे.काकासाहेब हे थोर देशभक्त स्वातंत्र्य सेनानी म्हणून प्रसिद्ध होते त्याच बरोबर शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे व काकासाहेब चव्हाण या थोर महामानवामुळे या विभागातील लोकांच्यात शैक्षणिक, सामाजिक ,आर्थीक  क्रांती झाली.तसेच माझ्या संपूर्ण कुंटबावरती काकासाहेब चव्हाण यांचे मोठे उपकार आहेत हे आम्ही जन्मभर विसरू शकणार नाही व त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही. काकांनी स्वातंत्र्य पुर्व काळात व स्वतंत्र उत्तर काळात मोलाची भुमिका बजावली आणि पाटण पंचायत समितीचे १ ले सभापती बनले तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे अध्यक्ष सुध्दा झाले एवढी मोठी व्यक्ती भविष्यात होणे नाही. काकांच्या या कार्याबद्दल माझे शतशः विनम्र अभिवादन.

   यावेळी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. पारितोषिकाचे वाचन प्रा सचिन पुजारी सरांनी केले तसेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा सौ बी.एस.सालवाडगी व प्रा सचिन पुजारी यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे आभार श्री वा वि तळमावलेचे मुख्याध्यापक श्री अशोक माने सरांनी मानले.

  या कार्यक्रमात दोन्ही संकुलातील आजी - माजी विद्यार्थी, गुरूदेव कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य, मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  हा कार्यक्रम यशस्वी कार्यक्रम पार पाडण्यासाठी दोन्ही संकुलातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.