कराड : कृष्णाकाठ वृत्तसेवा:
खासदार श्रीनिवास पाटील यांना वाढदिवसानिमित्त राजकिय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकर्त्यांनी फोन, मेसेज व सोशल मिडियावरून शुभेच्छा दिल्या. तसेच शुभचितंकांकडून ठिकठिकाणी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले होते.
खा.श्रीनिवास पाटील यांना फोनवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, खा.सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील, खा.संजय राऊत, पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, खासदार छ.उदयनराजे भोसले, दै.पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल, खा.श्रीरंग बारणे, खा.सुनील तटकरे, आ.मकरंद पाटील, आ.शशिकांत शिंदे, जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर,आ.दिपकचव्हाण,
कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले यांच्यासह राज्यातील अन्य आमदार, खासदार व राजकिय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री मदन बाफना, माथाडी नेते नरेंद्र पाटील, अंकुश काकडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड, माजी आमदार मोहनदादा जोशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, पिंपरी-चिंचवडचे संजोग वाघेरे-पाटील, एसजीएम कॉलेजचे प्राचार्य मोहन राजमाने, माजी कर्नल संभाजी पाटील, माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख, डॉ.विश्वनाथ कराड, युवानेते यशराज पाटील, कराडच्या मुख्याधिकारी महिका रमाकांत डाके, कराडचे पोलीस उपअधिक्ष्क रणजीत पाटील, नगरसेवक आबा बागूल,
अॅड.अनिकेत उज्ज्वल निकम, देवराजदादा पाटील, वैभव निंबाळकर, तेजस शिंदे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक व कार्यकर्त्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान वाढदिवसानिमित्ताने ठिकठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, अन्नदान व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले होते.