आठवडी बाजारातील भाजी विक्रते, व्यापारी, दुकानदार व टपरीधारकांचे लसीकरणाबाबत होणार तपासणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आदेश जारी.


सातारा दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यात कोविड संसर्गाचे रुग्ण दैनंदिन संक्रमित होत असून जिल्ह्यात ठिक ठिकाणी आठवडे बाजार भरत आहेत. या आठवडी बाजारामध्ये गर्दी विचारात घेता या ठिकाणी ग्रामीण भागातून बाजारपेठेत दूध-भाजीपाला विक्रीसाठी येणारे विक्रेते, व्यापारी, टपरीधारक व दुकानदार यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे काय? याबाबत काटेकोरपणे तपासणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदांचे मुख्याधिकारी तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.