जन सहकार निधीच्या दिनदर्शिकेचे खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन.

 

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

तळमावले येथील जनसहकार निधी लिमिटेड च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले. खा.श्रीनिवास पाटील व सारंग पाटील (बाबा) यांच्या शुभ हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी जनसहकार निधी लिमिटेडच्या विवध उपक्रमांबद्दल कौतुक केले.

यावेळी जनसहकार निधी लिमिटेडचे चेअरमन मारुतीराव मोळावडे, मँक्विन मिडियाचे विनायक शिनारे ,श्री.सुतार साहेब, जनसहकार लिमिटेडचे संचालक राजू जाधव पोतले ग्रामपंचायत सरपंच संदीप पाटील , उद्योजक गणेश उचाळे, शरद वडणे व आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा.श्रीनिवास पाटील यांनी दिनदर्शिकेचे जीवनातील महत्व विषद केले आणि दिनदर्शिकेची सुबक छपाई, परिपूर्ण माहिती पाहून त्यांनी चेअरमन मारुतीराव मोळावडे यांचे विशेष कौतुक केले.