डाॅ.संदीप डाकवे यांनी वाढदिनी ग्रंथालयाला दिली पुस्तके भेट


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
गेली काही वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत स्वतःचा वाढदिवस साजरा करत असलेल्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड होल्डर युवा चित्रकार व पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी वाढदिवसाचे व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत 75 पुस्तके विद्यानगर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयास दिली आहेत. याप्रसंगी प्रा.दादाराम साळुंखे, ग्रंथपाल रुक्साना नदाफ, रेश्मा कसबे, वैष्णवी देवळे, श्रध्दा पवार, तेजस भोसले, शुभांगी गोखले, आसावरी मोहिते, अभिनव मोहिते, सीमा कांबळे, चि.स्पंदन डाकवे व वाचक उपस्थित होते. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही पुस्तके दिली आहेत. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

याप्रसंगी बोलताना प्रा.दादाराम साळुंखे म्हणाले, ‘‘वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून ग्रंथालयाला पुस्तके देण्याचा डाॅ.संदीप डाकवे यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा. डाॅ.डाकवे नेहमी नावीण्यपूर्ण आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवत असतात ते आदर्शवत आहेत. वाढदिवसाला ग्रंथालयाला पुस्तके भेट हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.

डाॅ. डाकवेच्या या वेगवेगळया उपक्रमाला प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, प्रा.ए.बी.कणसे, वडील राजाराम डाकवे, आई सौ.गयाबाई डाकवे, आप्पासोा निवडूंगे, सौ. रेश्मा डाकवे, कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, जयंत कदम, एन.बी.परीट, सुरेश जाधव यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभते.

‘‘आपल्या प्रत्येक उपक्रमातून समाजाला काहीतरी देता आले पाहीजे असा माझा नेहमी प्रयत्न असतो. याच संकल्पनेतून ही 75 पुस्तके ग्रंथालयाला प्रदान केली आहेत. यामध्ये विविध दर्जेदार जुने-नवे दिवाळी अंक, साने गुरुजी, नीलकंठ खाडीलकर व अन्य नामवंत लेखकांची पुस्तके आहेत’’ असे मत डाॅ.संदीप डाकवे यांनी याप्रसंगी व्यक्त केेले.

यापूर्वी डाॅ.डाकवे यांनी चि.स्पंदन याची ग्रंथतुला करुन शाळेला पुस्तके दिली आहेत. कलासंपन्न, सामाजिक जाणिवेचे भान असलेल्या डाॅ.संदीप डाकवे या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाकडून भावी आयुष्यातही अशीच भरीव कामगिरी होत राहील यात शंकाच नाही.

 -------------------------------------------------

डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वी वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थांना मोफत वहया वाटप, शालेय तक्त्यांचे वितरण, स्वलिखित ‘मनातलं’ या चारोळीसंग्रहाचे प्रकाशन, अनाथाश्रमात धान्याचे वाटप, ऊसतोड मजूरांना शाल वाटप, रक्तदान, डाॅक्युमेंटरी पोस्टर प्रकाशन असे नावीण्यपूर्ण आणि हटके उपक्रम राबवले आहेत.

 -------------------------------------------------