सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराने स.पो.नि संतोष पवार यांचा वाढदिवस साजरा.तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांचा वाढदिवस भव्य रक्तदान शिबीर घेऊन साजरा करण्यात आला.

या वेळी ढेबेवाडी विभागातील 106 नागरिकांनी रक्तदान करून स.पो.नि संतोष पवार यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. 

  सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व अपघात व इतर अनेक कारणामुळे हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. रुग्णांसाठी रक्ताची खूप गरज असते त्याची जाणीव ठेवून स.पो.नि संतोष पवार यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास ढेबेवाडी विभागातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. व या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या वेळी विभागातील पत्रकारांनी सुद्धा सामाजिक गरज ओळखून रक्तदान करून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या .

  या वेळी स.पो.नि संतोष पवार यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान करणाऱ्यांचे मनापासून आभार मानले आणि गरजू रुग्णांसाठी नेहमी रक्तदान करण्याचे आवाहन ही केले.Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
काळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज