जनविकास पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.

 तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

तळमावले येथील जनविकास ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. साईराज को ऑप केडिट सोसा लि मुंबई या संस्थेचे संस्थापक चंद्रकांत चाळके व बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण यांचे शुभहस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत चाळके यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाबद्दल कौतुक केले.व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.

यावेळी उपस्थितांशी बोलताना चेअरमन बाळकृष्ण काजारी म्हणाले की जनविकास पतसंस्थेने स्थापनेपासून संगणकीकृत कामकाज तसेच सभासदांना एसएमएस सुविधेच्या माध्यमातून पारदर्शी कारभार करून संस्थेने सभासदांच्या विश्वासास पात्र ठरून अल्पाधीतच ७ कोटी व्यवसायाचा यशस्वी टप्पा पूर्ण करून रू .१० कोटी व्यवसायाकडे यशस्वीपणे वाटचाल सुरू केलेली आहे . संस्थेने संभासदांकरिता एसएमएस अलर्ट बँकिंग, आरटीजीएस/एनईएफटी, देशभरातील कोणत्याही  बँकिंग वरील चेक क्लिअरिंग, कोअर  बँकिंग, दैनंदिन बचत कलेक्शन अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत . त्याचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा असे मत जनविकास पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व आदर्श सरपंच बाळकृष्ण काजारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्‍त केले.

 या वेळी साईराज को ऑप केडिट सोसा लि मुंबई या संस्थेचे संस्थापक चंद्रकांत चाळके व बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण या प्रमुख अतिथींचे चेअरमन बाळकृष्ण काजारी यांनी स्वागत केले.

सदर कार्यकमास संजय चाळके , महेश शिदुक (सरपंच ग्रा . पं . शिद्रूकवाडी) , आत्माराम पाचुपते ( सरपंच ग्रा. पं. पाचुपतेवाडी ) , काकडे साहेब व मोरे साहेब विकास अधिकारी सातारा डीसीसी बॅक तळमावले , संदिप काजारी ( चेअरमन श्री हनुमान विकास सोसा . काजारवाडी),सरपंच, दत्तात्रय चोरगे , डॉ सतिश जगताप, डॉ . शाम सुपनेकर, डॉ. अजय सपकाळ, सुनिल पांढरपटटे, महादेव जाधव , भगवान मानकर, नंदकुमार काजारी,  विलास काजारी, राजेंद्र घारे व आत्माराम मोरे गुरूजी , आर. के काजारी, बाळु काजारी, उत्तम काजारी, उत्तम देसाई, रविंद्र साळुंखे, मनोज देसाई सचिव विकास सोसायटी, श्रीरंग तुपे,अविनाश मोहिते दादा, हिंदुराव पन्हाळे, जगनाथ डुबल फौजी, हणमंत पन्हाळे, विलास डुबल तसेच संस्थेचे सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते . पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र काजारी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .