दिल्ली येथील जनपथ वर झळकली सत्यजित वरेकर यांची कलाकारी


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
अन्यायासमोर आम्ही नमणार नाही, पाशवी व जुलमी सत्तेला सलाम करणार नाही, ती जुलमी सत्ता मला चिरडेल, चिरडो मी माझे आत्मिक स्वातंत्र्य राखून ठेवेन. हेच एक खरे स्वातंत्र्य. आम्ही निःशस्त्र असू, पण सत्तेचे वटहुकूम मुकाटयाने आम्ही मानणार नाही, असे ठणकावून सांगणारे क्रांतीसिंह नाना पाटील आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान व योगदान देणारे, समाजासाठी आयुष्य  वेचणारे महाराष्ट्रातील काही समाजसेवक आणि क्रांतिकारकांची शौर्यगाथा प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या जनपथ वर झळकणार आहे. पाटण तालुक्यातील वरेकरवाडी येथील चित्रकार प्रा.सत्यजित वरेकर यांची कला या निमित्ताने दिल्ली मध्ये झळकणार आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातीलच अन्य चित्रकारांनाही संधी मिळाली आहे.


महाराष्ट्रातून प्राचार्य सुरेंद्र जगताप, चित्रकार अविनाश मोकाशी, चित्रकार बालाजी चव्हाण, प्रा.प्रफुल्ल सुतार आणि प्रा.सत्यजित वरेकर या पाच चित्रकारांना निमंत्रित केले होते. 
प्रा.सत्यजित वरेकर यांनी या भव्य कॅनव्हासवर राजश्री शाहू महाराज यांचे साक्षरता आणि शेतकऱ्यांविषयीचे कार्य, महात्मा फुले, आणि सावित्रीाबाई फुले यांचे शिक्षणविषयक कार्य, लोकमान्य टिळक, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांचे योगदान, बाबुराव पेंटर यांचे चित्र आणि शिल्पकलेतील योगदान, बहिर्जी नाईक यांचे कार्य कर्तृत्व आपल्या कुंचल्यातून रेखाटले आहे.