ताईगडेवाडी परीसरात बिबट्याचा वावर...! ग्रामस्थ भयभीत


संग्रहित फोटो

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
तळमावले येथील ताईगडेवाडी परीसरात वाटेवरील शेतात पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलास साधारण दोनशे ते तिनशे फुटावर बिबटयाचे पिल्लू दिसले. 
त्याने ती माहिती ग्रामस्थांना दिली ही माहिती तळमावले येथील माजी उपसरपंच संजय भुलुगडे याना समजताच त्यांनी पुढील वनविभागाला बिबट्या बाबत माहिती दिली वनविभागाला माहिती मिळताच तातडीने वनविभागाचे वनपाल सुभाष राऊत, वनसेवक अजित कुंभार, सुरेश सुतार साहेब, वनरक्षक कुंभारगाव विभाग सुभाष पाटील, संजय भुलुगडे, अन्य ग्रामस्थ यांनी फणसाचे शेत या परिसरात पाहणी केली तर त्या ठिकाणी त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले हे ठसे बिबट्याचेच असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले यानंतर वनविभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की कोणीही एकटे शेतात फिरू नये बिबट्या बाबत काही माहिती मिळाल्यास वनविभागास माहिती दयावी त्या नंतर तातडीने ताईगडेवाडी तळमावले ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभाताई भुलुगडे यांनी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्या बाबतचे पत्र वनविभाग पाटण यांना देण्यात आले.त्यात त्यांनी म्हटले आहे ग्रामपंचायत ताईगडेवाडी ता पाटण परिसरात बिबट्याचा वावर असून बिबटया भरमानव वस्तीत येत असल्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्याचा वावर मानवी वस्तीत वाढल्यामुळे पाळीव जनावरे, मानवी जीवितास धोका निर्माण झाला आहे तरी ग्रामस्थांकडून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे आशा आशयाचे विनंती पत्र वनविभागास देण्यात आले आहे.