चेंबूरच्या आचार्य - मराठे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी खास लसीकरण मोहीम


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : शिवसेनेचे उपनेते सुबोध आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आणि वॉर्ड क्रमांक १५२ चे कार्यसम्राट नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या सुचनेनूसार मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागातील आरोग्य खात्याच्यावतीने चेंबूरमधील ना. ग. आचार्य मराठे काॅलेज मधील १५ ते १८ वयोगटातील सुमारे २८०० विद्यार्थ्यांसाठी खास मोफत लसीकरण मोहीमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

यावेळी आचार्य मराठे काॅलेजच्या प्राध्यापिका लेले मॅडम, आचार्य मराठे काॅलेज शिक्षण संस्थेचे विश्वस्त मापणकर सर, पांडे सर, शिवसेना महिला शाखा संघटीका अनिता महाडिक, चेंबूरच्या समाजसेविका मिनाक्षी पाटणकर, युवासेना चेंबूर विधानसभा समन्वयक गणेश गायकवाड, युवासेना उपविभाग अधिकारी विनय साठले, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये आणि बहुसंख्य विद्यार्थी व मान्यवर मंडळी उपस्थित होती.