खा.श्रीनिवास पाटील यांचा मतदारसंघात विकास कामांचा धडाका.

 


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
    खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध गावातील विकासकामांसाठी 2 कोटी 8 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

    राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्राच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा, गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी या योजनेतून निधी पुरवला जातो. त्यानुसार राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे खा.श्रीनिवास पाटील यांनी पत्र लिहून पाठपुरावा केला होता. खा.पाटील यांनी केलेल्या शिफारशीनुसार सातारा, वाई, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कराड व पाटण तालुक्यातील गावांसाठी हा निधी मंजूर झाला आहे. खा.श्रीनिवास पाटील यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला असून त्यांच्या माध्यमातून विविध योजनांंमधून भरीव निधी उपलब्ध होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

     सातारा तालुक्यातील जांभे येथे बौद्धवस्तीमध्ये सौर दिवे बसवणे 3 लाख, कारी येथे मातंगवस्ती व बौद्धवस्तीत अंतर्गत बंदिस्त गटर्स बांधणे 5 लाख, शहापूर येथे भानुदास यदु सकटे यांच्या घरापासून ते स्मशानभूमि पर्यंत जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, आसगाव येथे बौद्धवस्तीत डांबरीकरण करणे 5 लाख, वडूथ येथे बौद्धवस्तीत नाला बंदिस्त व कॉंक्रिटीकरण करणे 7 लाख, कळंबे येथे मातंगवस्तीत संरक्षक भिंत बांधणे 5 लाख,

     जावळी तालुक्यातील बेलावडे येथे बौद्धवस्तीत पेव्हर ब्लॉक बसवणे 3 लाख, कुडाळ येथे मागासवर्गीय वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, केळघर येथे बंदिस्त गटर्स बांधणे 5 लाख, वालुथ येथे मागासवर्गीय वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 4 लाख, गोदेमाळ येथे मागासवर्गीय वस्तीसाठी समाज मंदिर बांधणे 5 लाख,

     कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथे मागासवर्गीय वस्तीमधील बंदिस्त गटर्स बांधणे कामासाठी 5 लाख, तळवडे सं. येथे बेघर वस्तीकडे जाणारा रस्ता करणे 5 लाख, सुर्ली येथे मागासवर्गीय वस्तीमधील बंदिस्त गटर्स बांधणे कामासाठी 5 लाख, त्रिपुटी येथे बौद्ध वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बांधणे 5 लाख, 

     खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, पाडळी येथे मागासवर्गीय वसाहतीमधील सभागृह दुरुस्ती करणे 5 लाख, सुखेड येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये व्यायामशाळा बांधणे 7 लाख,

     खटाव तालुक्यातील वडगाव ज.स्वा. येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, पारगाव येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, होळीचागांव येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख,

     वाई तालुक्यातील बावधन येथे गावठाण वस्तीमध्ये बंदिस्त गटर्स बांधणे 7 लाख, धावडी येथे बौद्धवस्तीत अंतर्गत बंदिस्त गटर्स बांधणे 5 लाख, पसरणी येथे मातंगवस्तीत अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख,

     कराड तालुक्यातील चिमणगाव येथे बौध्दवस्तीमध्ये बंदीस्त गटर्स बांधणे 5 लाख, आणे येथे मागासवर्गीय वस्तीत शौचालय युनिट बांधणे 8 लाख, खुबी येथे बौद्धवस्तीत अंतर्गत बंदिस्त गटर्स बांधणे 5 लाख, कालगाव येथे मागासवस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, हजारमाची येथे ओगलास घर ते बनसोडे घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, येरवळे येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, पार्ले येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, पोतले येथे अंतर्गत गटर्स बांधणे 5 लाख, नारायणवाडी येथे अंतर्गत खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लाख,

     पाटण तालुक्यातील घोट येथे मातंगवस्तीसाठी स्मशानभूमि बांधणे 7 लाख, मारूल हवेली येथे सामाजिक सभागृह बांधणे 5 लाख, काढणे येथे मागासवर्गीय वस्तीमधील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 7 लाख, खळे येथे बौद्धवस्तीसाठी अंतर्गत गटर बांधणे 5 लाख, विहे येथे काटरे घर ते दीपक लिंबारे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख