खळे येथील जोतिर्लिंग मंदिराच्या सभामंडपाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

छाया : महेश कचरे (कलासंगम फोटो) 

तळमावले | राजेंद्र पुजारी :
 सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या निधीतून खळे तालुका पाटण येथे ज्योतिर्लिंग मंदिराच्या सभामंडपासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या जोतिर्लिंग मंदिराच्या सभामंडपाचे मान्यवरांच्या हस्ते नूकतेच भूमिपूजन संपन्न झाले.   

यामध्ये लोकशाही आघाडी कराडचे अध्यक्ष जयंत पाटील, लोकशाही आघाडीचे गटनेते व कराड नगरपालिकेचे नगरसेवक सौरभ पाटील, कराड मार्केट कमिटीचे संचालक सुनील पाटील, नगरसेवक शिवाजी पवार, आंबेकरी, प्रमोद शिंदे, कराड दक्षिणचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष पाटील ,खळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच वसंत शंकर पानवळ या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न झाले.

यावेळी खळे ग्रामस्थ व देवस्थान कमिटीच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खळे व परिसरातील ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पाटण पंचायत समितीचे माजी सदस्य महादेव पानवळ यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले खळे गावातील ज्योतिर्लिंग मंदिर हे पुरातन असून खळे गावाचे ग्रामदैवत आहे व जागृत असे देवस्थान आहे. या मंदिरासाठी भव्य अशा सभामंडपाची नितांत गरज होती व ही गरज ओळखून जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी आपल्या विकास निधीतून दहा लाख रुपये मंजूर केले. या विकास कामाचे आज मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजनही संपन्न झाले. याबद्दल मी ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. या सभामंडपा मुळे मंदिराची शोभा अधिक वाढेल व ग्रामस्थांनाही मंदिराच्या विविध धार्मिक कार्यक्रमासाठी खूप चांगला उपयोग होईल. आज या मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न झाले या प्रमुख अतिथींचे खळे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत.

यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जयंत पाटील म्हणाले या गावाने आमचे प्रेमाने स्वागत केले त्यामुळे आम्ही भारावून गेलो.  या मंदिराबाबत मी ग्रामस्थांकडून माहिती घेतली. 1952 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता अतिशय देखणं पुरातन अस छान मंदिर आहे. आता मजबुतीकरण करणे गरजेचे आहे, मी व माझे बंधु ना.बाळासाहेब पाटील व सर्व सहकारी यांचे वतीने ग्वाही देतो या मंदिर जीर्णोद्धार व  सभामंडपासाठी कोणताही आर्थिक निधी कमी पडणार नाही. आपण वेगळ्या पद्धतीने आमचा मानसन्मान व प्रेमभावनेने स्वागत केले आपले स्वागत व प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो. या गावाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू. गावातील अजूनही काही विकास कामे प्रलंबित असतील तर त्याचे प्रस्ताव आमच्याकडे द्या आम्ही नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे हे प्रस्ताव देऊन आपली विकास कामे पूर्णत्वास नेऊ अशी मी आपणास ग्वाही देतो.

यावेळी उपस्थित खळे ग्रामपंचातीचे सरपंच वैशाली महापुरे, उपसरपंच वसंत पानवळ, भुजंगराव कचरे, वाल्मिक पानवळ, संजय पानवळ, विजयसिँह वाघ, धनाजी कचरे, गजानन कचरे, विक्रम वाघ, नितीन पाटील, सचिन पानवळ, हे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ यांचे आभार चंद्रकांत रामचंद्र पाटील यांनी मानले.