तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन शनिवारी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व ढेबेवाडी विभागातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
या मध्ये ताईगडेवाडी ता पाटण पुनर्वसन वरचे घोटील येथे रस्ता सुधारणा करणे २० लक्ष. निगडे पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५ लक्ष, कसणी रस्ता पाटीलवस्ती ते मुरुमवस्ती खडीकरण डांबरीकरण करणे १५ लक्ष.मत्रेवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५ लक्ष. वाझोली गावठाण खडीकरण डांबरीकरण करणे १५ लक्ष. पाचूपतेवाडी (गुढे) अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५ लक्ष.
वाखानवस्ती कराड ढेबेवाडी, सणबूर महिंद नाटोशी रस्ता प्रजीम ५५ किमी ३९/७०० ते ४०/५०० मधील रस्त्याची सुधारणा करणे ,बांधीव गटर बांधणे व छोट्या पुलाची पुनर्बांधणी करणे (अर्थसंकल्प (२०२०-२१) ४०० लक्ष,
या सर्व कामांचा भूमिपूजन समारंभ मोरणा शिक्षण संस्था अध्यक्ष रविराज देसाई दादा यांचे प्रमुख उपस्थितीत, बाळासाहेब देसाई सह साखर कारखाना दौलतनगर मरळी चे माजी चेअरमन डॉ दिलीपराव चव्हाण, संचालक शिवदौलत बँक मधुकर पाटील, धनाजी चाळके, जोतिराज काळे, पाटण तालुका शिवसेना प्रमुख राजेश चव्हाण, उप प्रमुख सागर नलवडे, तानाजी चाळके, विनायक डुबल, मनोज मोहिते, सचिन यादव, तुषार चाळके, विक्रम यादव, कुणाल माने, यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले.