भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या भूमीपुत्रांचा खळे ग्रामस्थ, सोसायटी व ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खळे ता पाटण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खळे गावच्या भूमि पुत्रांचा सन्मान व गौरव करण्यात आला.
या वेळी न्यू इंग्लिश स्कूल खळेचे शिक्षक पंडित सुतार, फौजी भारतीय सेना पवन सुतार, फौजी भारतीय सेना ऋतिक कचरे,सेवानिवृत महाराष्ट्र पोलीस वाल्मिक पानवळ, न्यू इंग्लिश स्कूल कर्मचारी सुभाष कदम, पाटण पंचायत समितीचे माजी सदस्य महादेव पानवळ या सर्वांचा या वेळी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
  सदर कार्यक्रमासाठी उपसरपंच वसंत पानवळ, ग्रामपंचायत सदस्य बाबासो शेख, सीमा कचरे, माजी सरपंच, भुजंगराव कचरे, गजानन कचरे, विजयसिंह वाघ, अधिक पानवळ, नामदेव पाटील, धनाजी कचरे,सी.आर पाटील, संजय पानवळ, बाळासाहेब पानवळ, सचिव दीपक कचरे व इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते .


    या वेळी गणेश गुढेकर, हरीष गुढेकर,शरद कचरे, विक्रम वाघ, सचिन पानवळ, रोहित कचरे, कृष्णत पानवळ, राहुल कचरे, विशाल कचरे, महेश कचरे , समाधान पाटील, पंकज पानवळ व खळे ग्रामस्थ उपस्थित होते .
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण आबा यांनी केले ते म्हणाले ग्रामपंचायत व सोसायटी यांचे वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा सत्कार होत आहे. आज आपण आपल्या भूमीपुत्राचा सत्कार करत आहोत त्यांनी अतिशय हलाकीच्या परिस्थितीत त्रास सहन करत भारतीय सैन्य दलात भरती झाले आहेत त्या मुळे आम्हा सर्व ग्रामस्थांना अभिमान आहे. यावेळी प्रथम ऋतिक तानाजी कचरे यांचा सत्कार बबन पानवळ यांनी केला तर पवन संजय सुतार यांचा सत्कार नामदेव पाटील यांनी केला, त्यानंतर न्यू इंग्लिश स्कुल चे मुख्याध्यापक निवृत्त झालेने त्यांचा सत्कार माजी चेअरमन गजानन कचरे यांनी केला. सेवानिवृत्त वाल्मिक पानवळ यांचा सत्कार संजय पानवळ यांनी केला. पाटण पंचायत समितीचे माजी सदस्य महादेव पानवळ यांचा सत्कार धनाजी कचरे यांनी केला. 
     यावेळी उपसरपंच वसंत पानवळ, संभाजी गुरव, सी.आर पाटील, महादेव पानवळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
      या वेळी पाटण पंचायत समितीचे माजी सदस्य महादेव पानवळ यांचा वाढदिवस सर्व मान्यवरांचे उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार दिपक कचरे यांनी मानले.