पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेस पक्षाकडून ३ राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी

काँग्रेस अध्यक्षा यांच्या सूचनेनुसार आ. चव्हाण लखनऊ ला रवाना कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या पाचही राज्यात काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीने उतरलेला दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाने पक्षाचे जेष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या प्रचार रणनीती ची जबाबदारी सोपवली आहे. असा निर्णय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार झाला असून त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण उत्तरप्रदेश ची राजधानी असलेल्या लखनऊ ला रवाना झाले आहेत, तिथे त्यांच्या पत्रकार परिषदा होणार असून प्रचार यंत्रणेत सुद्धा ते सहभागी असणार आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने व्हर्चुअल पद्धतीने प्रचार यंत्रणेला परवानगी दिली आहे त्याप्रमाणे सर्व पक्षांचा प्रचार या पाचही राज्यात सुरु आहे. व्हर्चुअल प्रचार तसेच पत्रकार परिषदा अश्या काही तंत्रानुसार प्रचार सुरु आहे. यानुसार तीन राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याचे महत्वपूर्ण काम काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविले आहे. आ. चव्हाण उत्तरप्रदेश, उत्तराखंड व गोवा या राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन पक्षाची भूमिका मांडणार आहेत.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
काळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज