श्री संतकृपा डी फार्मसी महाविद्यालयांमध्ये कार्यशाळेचे आयोजन.

घोगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
घोगाव ता.कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म महाविध्यालयामध्ये नूकतीच कार्यशाळा संपन्न झाली.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी [ डी. फार्म ] हे महाविध्यालय विध्यार्थ्याच्या उज्वल भवितव्यासाठी सतत विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते. नुकतेच झालेले वर्क शॉपचे आयोजन या वर्क शॉपचा विषय होता इंडस्ट्री अवेरनेस एंटरप्रिनरशिप डेव्हलोपमेंट असोसिएट विथ ओपेक्स अक्सलरेटर प्रा. लि. हा होता. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. सचिन कुंभोजे [ओपेक्स अक्सलरेटर प्रा. लि. चे सी.ई.ओ.] हे होते. त्यांनी फार्मासुटिकल एंडस्ट्रीचे फॅक्ट काय आहेत. जॉब ओपुर्चीनिटीज, दर्जा, प्रॉडक्ट मॅन्युफक्चरिंग तसेच एखादा उध्योग, लघुउद्योग कसा सुरू करायचा अशा विविध विषयावर सचिन कुंभोजे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

यावेळी सिद्धांत जाधव व सचिन पाटकर यांनीही विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका चवरे यांनी केले. काळे साठी उपस्थित असलेले मान्यवर प्रमुख अतिथींचे स्वागत प्राचार्या वैशाली महाडीक यांनी केले. सदर कार्यशाळेसाठी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक वर्ग यांचे दीप्ती पाटील यांनी आभार मानले.