नवभारत पतसंस्थेत नुतन स्वीकृत व तज्ञ संचालकांची निवड .


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
नवभारत पतसंस्था तळमावलेच्या नुतन स्वीकृत व तज्ञ संचालकांची निवड पार पडली आहे.
नवभारत पतसंस्थेच्या मुख्य कार्यालय या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण ,अर्थ सभापती संस्थेचे संस्थापक संचालक श्री संजय देसाई , संस्थेचे व्हा.चेअरमन श्री महेश ताईगडे आणि नायर साहेब तसेच संस्थेचे संचालक यांच्या उपस्थित नुतन स्वीकृत व तज्ञ संचालकांची निवड करण्यात आली. या वेळी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्वीकृत व तज्ञ संचालक पदी श्री महेश सदाशिव शिद्रुक - सरपंच , शिद्रुकवाडी ग्रामपंचायत, श्री उमेश शंकर शेलार - उपसरपंच, कुठरे ग्रामपंचायत , श्री शेडगे दादासो धनाजी - आदर्श शिक्षक, श्री तुषार तानाजी चाळके - गव्हर्नमेंट कॉन्टॅक्ट्रर व तृप्ती कन्स्ट्रक्शन, श्री रामचंद्र बाळकु सुर्वे या सर्वांची निवड करण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक संजय देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या वेळी ते म्हणाले की, ही संस्था सन २००६ साली स्थापन करुन या विभागातील लोकांची सहकार क्षेत्रातील गरज ओळखून सुरू केली आहे. "विना सहकार नाही उद्दार" हे ब्रीद घेऊन संस्थेच्या ठेवी या २७ कोटीच्या पुढे गेल्या आहेत तसेच पतसंस्थेच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रायगड, मुंबई, कोकण इ.कार्यक्षेत्र मिळाले आहेत एकुण मुख्यकार्यालयासहित एकुण ७ शाखा आत्याधुनीक पद्धतीने व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संस्था कामकाज करत आहेत . 

या तज्ञ संचालका पैकी प्रात्येनिधीक स्वरूपात श्री दादासो शेडगे गुरूजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले कि, आमची तज्ञ संचालक म्हणून निवड केल्याबद्दल मी देसाई साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच निश्चित पध्दतीने आम्ही सर्वजण मिळुन आपली नवभारत पतसंस्था ही नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न करू अशी भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे व्यवस्थापक श्री. अमोल माने, कुंभारगाव शाखा प्रमुख श्री प्रकाश ठिक , ढेबेवाडी शाखा प्रमुख श्री. विनोद लोहार, कराड (अगाशिवनगर ) शाखा प्रमुख श्री. सुभाष माने या सर्वांची प्रथम ओळख करून दिली तसेच वाई,पेण (पनवेल), नवी मुंबई (कोपरखैरणे) या ठिकाणचे शाखा प्रमुख सर्वजण उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन के.सी.कॉलेज, तळमावलेचे प्राध्यापक व संजिवन प्रतिष्ठान कुंभारगावचे सचिव प्रा.सचिन पुजारी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रज्योत मोरे यांनी मानले.