‘साम टीव्ही’ ने घेतली ‘शिवसमर्थ’ च्या कर्तृत्वाची दखल


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यातील तळमावले येथील दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सोसा.लिमिटेड ची यशोगाथा गुरुवार दि.20 जानेवारी, 2022 रोजी दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी प्रसारित करण्यात आली. सुमारे 22 मिनिटांची ही यशोगाथा होती. यामध्ये संस्था स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.

‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाच्या ओळीप्रमाणेच सर्वसामान्यांचा संसार सुखी करण्याचा ध्यास सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी (गुढे) येथील ऍड.जनार्दन बोत्रे यांनी बाळगला आहे.  

संतवचनांचे वाचन, पठन मनन करत असताना ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे काम शिवसमर्थ परिवार करत आहे. 15 ऑगस्ट, 2006 रोजी लावलेल्या छोटयाशा रोपटयाचा आज वटवृक्ष झाला आहे. या वटवृक्षाच्या छत्रछायेखाली आज शेकडो संसार गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ऍड.बोत्रे यांनी शिवसमर्थ परिवार ही संकल्पना राबवली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून जोडलेले खातेदार, ठेवीदार यांचेसह संस्थेमध्ये/घटक संस्थेत काम करणारा कर्मचारी हा केवळ कर्मचारी न राहता तो आपल्या कुटूंबाचा भाग आहे असे समजले जाते. यामुळे सर्व घटक सुखदुखात सहभागी होतात. हे वेगळेपण आहे. आज कार्पोरेटच्या जगतात केवळ पैसा किंवा भौतिक सुविधांकडे लक्ष देत असताना मानवाची नैतिक मुल्ये जपण्याचे काम सर्वार्थाने संस्थेेच्या माध्यमातून केले जाते.

‘‘सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतू तेथे भगवंताचे अधिश्ठान पाहीजे’’ हे ब्रीद वाक्य घेवून संस्था वाटचाल करत आहे. या ब्रीद वाक्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ कृतीत आणण्याचे काम शिवसमर्थ परिवारात केले जात आहे.

या सर्वांचा समावेश असलेली शिवसमर्थची यशोगाथा प्रसारित करण्यात आली. ही यशोगाथा पाहिल्यानंतर अनेकांनी शिवसमर्थवर कौतुकाचा वर्षाव केला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या गौरवशाली वाटचालीचे मनापासून कौतुक केले. अभिनेते कमलेश सावंत, अभिनेत्री सुनंदा शेंडे, अभिनेता राजेश कांबळे यांनी व्हिडीओ शेअर करुन संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सदर बातमीचा व्हिडीओ https://youtu.be/PpTUu6a0Bzo या लिंक वर पाहू शकता.