खा.श्रीनिवास पाटील यांची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह. जनतेला केले हे आवाहन
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार व राष्ट्रवादीचे नेते खा.श्रीनिवास पाटील यांची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. खा. श्रीनिवास पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत व त्यांची तब्येत उत्तम असल्याचे जनसंपर्क कार्यालयातून सांगण्यात आले आहे. 

 खा. श्रीनिवास पाटील यांचे जनतेला आवाहन :

खा.श्रीनिवास पाटील यांनी याबाबत लोकांना ट्विट करुन आवाहन केले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपचार सुरु असून. कृपया काळजी करु नये. आपणास विनंती आहे की, गेली दोन तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा. 

खा. श्रीनिवास पाटील यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून अनेक लोक , कार्यकर्ते कामानिमित्त कराड येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात येत असतात.
गेल्या तीन ते चार दिवसात खा.पाटील यांनी सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती.