पाटण नगर पंचायतीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय तर शिवसेनेला केवळ २ जागा

 

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण नगरपंचायतीचा निकाल नुकताच हाती आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने मोठा विजय प्राप्त केला आहे .

पाटण नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने १७ पैकी १५ जागा मिळवून सत्ता अबाधित ठेवली आहे. तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या देसाई गटाला व शिवसेना पक्षाला या ठिकाणी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

पाटण मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून मोठ्या उत्साहात विजय साजरा केला.