उद्योजक भगवान मोरे यांनी वाढदिनी जपली सामाजिक बांधिलकी : अनाथआश्रमातील मुलांसोबत केला वाढदिवस साजरा.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तळमावले येथील शिवाजी मॉल व शिवाजी प्रोव्हीजन्स स्टोअर्सचे मालक श्री.भगवान मोरे यांनी कोळे येथील जिजाऊ अनाथआश्रमातील मुलांच्या सोबत मुलांना खाऊ व शालेय उपयोगी वस्तू, कपडे देऊन वाढदिवस साजरा केला.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सचिन पुजारी यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले दादांच्या जिवनाचा प्रवास हा अत्यंत खडतर होता व संघर्ष करत करत ते सध्या एक यशस्वी उद्योजक बनले आहेत. त्यांच्या यशस्वी उद्योजका मागे जिद्द, चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास , प्रामाणिकपणा व कठोर परिश्रम हे गुण आहेत.

 त्यांच्यावर आरोग्य्याचे भयानक संकट आले कँन्सरचे दोनदा ऑपरेशन होऊन ही प्रचंड आत्मविश्वास व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या असाध्य रोगावर ही मात करून विजय प्राप्त केला. व सध्याचे जीवन ते आनंदाने , धैर्याने व आत्मविश्वासाने जगत आहेत. यामध्ये त्यांच्या पत्नीची मोलाची साथ आहे तसेच त्यांचे नातेवाईक व मित्रपरिवार यांचीही साथ त्यांना लाभली आहे. 

 वाढदिवानिमित्त त्यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण केले व दादांच्या मित्रपरिवारानी समक्ष घरी येऊन वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या यामध्ये - श्री.संजय भुलूगडे (माजी उपसरपंच ताईगडेवाडी) , श्री.भगवान नलवडे तात्या (माजी उपसरपंच गुढे) , श्री.सुरेश यादव (माजी उपसरपंच तळमावले) , प्रा.सचिन पुजारी सर (सचिव, संजिवन प्रतिष्ठान कुंभारगाव) व घरातील नातेवाईक यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला . 

 त्यानंतर जिजाऊ आनाथ आश्रम कोळे येथील मुलांच्या समवेत दादांचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी विकास मोरे, शशिकांत मोरे,चि.ओंकार देशमुख , श्री. समीर नदाफ व सौ नदाफ मँडम हे उपस्थित होते.

या वेळी नवभारत पतसंस्था मुख्य कार्यालयात श्री.भगवान मोरे दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने श्री अमोल माने (व्यवस्थापक) यांच्या शुभहस्ते शाल,श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे संस्थापक व सातारा जिल्ह्याचे माजी शिक्षण सभापती श्री संजय देसाई यांनी फोनवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.