प्रा.सचिन पुजारी यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा. एक स्तुत्य उपक्रम


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
निमित्त वाढदिवसाचे पण हा वाढदिवस केक कापून जल्लोषात न करता प्रा.सचिन पुजारी (सर) यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत, अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. कोळे ता कराड, येथील जिजाऊ अनाथआश्रमातील मुलांच्या सोबत वाढदिवस साजरा करण्यात आला मुलांना खाऊ व शालेय उपयोगी वस्तू देऊन त्यांनी अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.
आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांच्या पैकी हा एक दिवस मी कधीही विसरू शकणार नाही, अशा भावना प्रा. सचिन पुजारी यांनी व्यक्त केल्या.
फाइव स्टार हॉटेल मध्ये केलेल्या पार्टी पेक्षा आश्रमात केलेल्या कार्यक्रमांचा आनंद कित्येक पटीने जास्त असून व प्रत्येकाने याच पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे आव्हान प्राध्यापक पुजारी यांनी यावेळी बोलताना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सुतार धर्माधिकारी यांनी केले यावेळी त्यांनी उपस्थितांनी विनंती केली की आपल्या मुलांच्या वाढदिवसाला त्यांना अनाथआश्रमात, वृद्धाश्रमात घेऊन जावे व तेथे खाऊ वस्तू वाटप करावे म्हणजे मुलावरही चांगले संस्कार होतील. 

या कार्यक्रमास श्री.संजय भुलूगडे (माजी उपसरपंच ताईगडेवाडी) , श्री.नंदकुमार खटावकर (सदस्य कुंभारगाव ग्रामपंचायत) , श्री. माणिक खटावकर (माजी सदस्य कुंभारगाव ग्रामपंचायत) , श्री. सुनील उर्फ धर्माधिकारी सुतार (विश्वकर्मा प्रतिष्ठान कुंभारगाव खजिनदार), श्री.राहुल शेडगे (सामाजिक कार्यकर्ते, महिंद), श्री.बसाप्पा पुजारी , भुलूगडे गुरूजी ,ओंकार देशमुख (कोळे) , सौ.शारदा पुजारी मँडम (संचालिका ,नवभारत पतसंस्था,तळमावले), श्री. समीर नदाफ व सौ नदाफ मँडम उपस्थित होते.