तळमावले येथील मर्चंट सिंडिकेट पतसंस्थेच्या चेअरमनपदी ज्ञानदेव जाधव तर व्हा.चेअरमनपदी सर्जेराव नलवडे.


मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.सह.पतसंस्थेच्या बिनविरोध निवड झालेल्या चेअरमन व व्हा.चेअरमन आणि संचालकांचा सत्कार करताना पाटणचे सहा. निबंधक संभाजीराव नलवडे सोबत संस्थापक अनिल निवृत्ती उर्फ दादा शिंदे व मान्यवर.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

बिनविरोध पंचवार्षिक निवडणूक झालेल्या मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शे.सह. क्रेडिट संस्था मर्या. तळमावले ता.पाटण या संस्थेच्या चेअरमनपदी ज्ञानदेव श्रीपती जाधव तर व्हा.चेअरमनपदी सर्जेराव शंकर नलवडे यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी पाटणचे सहाय्यक निबंधक संभाजीराव नलवडे व संस्थेचे संस्थापक अनिल निवृत्ती शिंदे(दादा)यांची उपस्थिती होती.

           नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये शिवराम बापूराव पवार (मामा), डॉ.चंद्रकांत केशव बोत्रे, अनिल रामचंद्र माने ,प्रकाश शामराव देसाई , सुरेश बाबुराव देसाई, राजेश शंकर करपे,शिवाजीभाऊसो देसाई,जितेंद्र जगन्नाथ कोळेकर,लक्ष्मण मारुती मत्रे, सचिन अधिकराव तडाखे, बाबासो बाबुराव जाधव, सौ.सुजाता रामचंद्र मोरे, सौ.कल्पना शांताराम जाधव यांचा समावेश असून नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार सहाय्यक निबंधक संभाजीराव नलवडे यांच्या हस्ते करण्यात आला.नलवडे साहेबांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.