तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
स्पंदन प्रकाशनाची निर्मिती असलेल्या ‘स्नेहबंध’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी पुस्तकाचे लेखक डाॅ.संदीप डाकवे, भरत साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित होते. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांची प्रथम भेट झाल्यापासून आतापर्यंतच्या विविध उपक्रमाचे फोटो यात आहेत. ना.देसाई यांनी या पुस्तकातील प्रत्येक पानाचे बारकाईने अवलोकन करत असताना प्रत्येक पानावरील फोटोची आठवण सांगितली. त्यांनी डाॅ.डाकवे यांच्या फोटो संग्रहाचे व फोटोबद्दलच्या अचूक माहितीचे, कलात्मक वृत्तीचे कौतुक करुन त्यांना शाबासकी दिली. डाॅ.संदीप डाकवे यांचे हे चौथे पुस्तक आहे. प्रत्येक पुस्तकाबाबत त्यांनी वेगळेपण जपलेले आढळते. पहिल्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन स्वतःच्या वाढदिनी, दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन गणेशचतुर्थीदिनी आईवडिलांच्या हस्ते, चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन जागतिक टपालदिनी डाकघरात पोस्टमन काकांच्या हस्ते झाले आहे.
या पुस्तकात 200 हून जास्त फोटोग्राफ्स आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक फोटोपेज खाली थोडक्यात माहिती दिली आहे. रांगोळी, पुस्तक, चित्रे भेट, कात्रण प्रदर्शन, पुस्तक प्रकाषन, हस्तलिखित प्रदर्शन इ. उपक्रमाची माहिती यात आहेत. फोटोची सुसंगत आणि सुयोग्य मांडणी व माहिती यात असल्याने पुस्तकाने वेगळी उंची गाठली आहे. 'स्नेहबंध' या अनोख्या वेगळया पुस्तकाचे उपस्थित लोकांनी कौतुक केले.