जनसहकार निधी संस्थेस खा.श्रीनिवासजी पाटील यांची सदिच्छा भेट.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
तळमावले ता.पाटण येथील जन सहकार निधी संस्थेस सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. 

या वेळी त्यांनी संस्थेतील ठेवी व योजनांची सविस्तर माहिती संस्थेचे चेअरमन मारुतीराव मोळावडे यांच्या कडून घेतली. तसेच संस्थेच्या कामकाजा बद्दल व विविध उपक्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. मोळावडे व सर्व संचालकांचे विशेष कौतुक केले. या वेळी संस्थेच्या वतीने खा.श्रीनिवासजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला .

संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार व सेवक वर्ग या वेळी उपस्थित होते . या वेळी खा.श्रीनिवासजी पाटील यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली व मार्गदर्शन केले.

या वेळी विभागातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, व्यापारी वर्ग व विभागातील इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी काही गावातील सरपंचांनी गावच्या विकास कामा संदर्भात खा.श्रीनिवासजी पाटील यांना निवेदने दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की विभागातील गावा गावात विकासकामे पोहचतील अशी मी ग्वाही देतो. अनेक गावात विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. यावेळी त्यांनी उपस्थीत कार्यकर्त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी काढणे गावचे सरपंच सुरज चक्के यांचा वाढदिवस साजरा केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत चिखलेवाडी(कुंभारगाव), करपेवाडी, मानेगाव, काढणे, तळमावले, मोरेवाडी(कुठरे), वाझोली येथील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.