अनाथांची माय हरपली, सिंधुताई सपकाळ यांनी 75 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

 


पुणे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले आहे. आज वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते.

सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले होते. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणत. सिंधुताई सपकाळ यांना शासनाने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्या बुद्धिमान होत्या परंतु परिस्थिती अभावी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.

अशा थोर समाजसेवक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे आज दुःखद निधन झाले. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची अनाथांची माय हरपली.

Popular posts
अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद, शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
इमेज
"मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब." माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच खोचक ट्विट
इमेज
राज्यात शिंदे सरकार येणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, फडणवीस मंत्रिमंडळात नाहीत
इमेज
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदा सोबतच आमदारकीचाही राजीनामा ; बंडखोर आमदारांवर शेवटच्या भाषणातही खेद.
इमेज
एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ
इमेज