नेरुळमधील धडाडीचे तडफदार युवा तरुण समाजसेवक व लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांना सामाजिक कार्याबद्दल यशवंतराव चव्हाण पुरस्काराने सन्मानित.

 


नवी मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
समाजकार्यात व गोर – गरिबांच्या हाकेला सदैव धावून जाणारे अशी ख्याती असलेले नेरुळमधील धडाडीचे तरुण तडफदार युवा समाजसेवक व लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबईतर्फे यशवंतराव चव्हाण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सानपाडामधील सौराष्ट्र समाज हॉल येथे कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणास्थानावर आधारित यशवंतराव चव्हाण फांऊंडेशन,मुंबई तर्फे भव्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यांच्या माध्यमातून वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाजिक कार्यकर्ताचा सन्मान करून त्यांना सन्मानित करण्यात येते.

तसेच या कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा. श्री. प्रविण दरेकर,ऐरोली विधानसभेचे आमदार लोकनेते मा. श्री. गणेशजी नाईक, बेलापूर विधानसभेचे आमदार मा. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. श्रीकांत भारतीय, प्रमुख वक्ते म्हणून मा.श्री. संजय शेटे (सहकार नेते), प्रमुख उपस्थिती म्हणून मा.आ. निरंजन डावखरे, मा.श्री. आ. नरेंद्र पाटील, मा.श्री. ज्ञानेश्वर वांगडे (चेअमन सातारा सहकारी बँक लि.) यांच्या हास्ते

 नेरुळमधील धडाडीचे तरुण तडफदार युवा समाजसेवक व लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांना पुरस्कार मिळाल्याने अनेक प्रतिष्ठित लोकांनी तसेच त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांचे प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले.