नवभारत पतसंस्थेच्या वतीने वाहन वितरण सोहळा संपन्न.

 


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

  तळमावले ता.पाटण येथील नवभारत पतसंस्थेच्या वतीने नुकताच वाहन वितरण सोहळा संपन्न झाला. श्री.ष.ब्र.१०८ डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज व श्री.ष.ब्र.१०८ महादय्या रवीशंकर शिवाचार्य महाराज या दोन्ही संतमहंत यांच्या शुभहस्ते आणि नवभारत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी शिक्षण,अर्थ सभापती संजय देसाई यांच्या उपस्थित वाहनवितरण सोहळा संपन्न झाला. हा खरा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल भारतीय हिंदू संस्कृतीत म्हटल्याप्रमाणे - ' साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा ' ,या उक्तीप्रमाणे संस्थेच्या मुख्य कार्यालयात संतमहंत यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने व फुलांची उधळन करून अतिशय आनंदाच्या वातावरणात दोन्ही महाराजांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा सचिन पुजारी सर व सौ शारदा पुजारी या दाम्पत्यांच्या हस्ते दोन्हीही महाराजांचे पाद्यपूजा शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात आली. तदनंतर हिंदू संस्कृती प्रमाणे अतिथी देव भव: या उक्तीप्रमाणे दोन्हीही महाराजांचे भगवी शाल श्रीफळ, हार देऊन मा संजय देसाई यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

  या वेळी दोन्हीही महाराजांच्या शुभहस्ते नवभारत पतसंस्था तळमावलेचे नुतन संचालकांचा व व्यवस्थापक यांचा आणि भागातील आजी माजी सरपंचांचा शाल,श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.  

  यावेळी तळमावले ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शोभाताई भुलूगडे यांच्या हस्ते.ष.ब्र.१०८ डॉ निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांचा सत्कार करण्यात आला.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा सचिन पुजारी सर यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार संस्थेचे व्यवस्थापक अमोल माने यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास भागातील आजी - माजी सरपंच, व्यापारी वर्ग, युवा उद्योजक, महिला भगिनी ,ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.