सचिन पवार तडसरकर व माणिक खटावकर मिस्त्री यांचा यशवंतराव चव्हाण पुरस्काराने गौरव.

 कुंभारगाव | राजेंद्र पुजारी :

यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन मुंबई यांचे वतीने समाजातील शिक्षण, सामाजिक, कला, राजकीय, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2020 देऊन गौरवण्यात आले.

  शनिवार दि.4/12/2021 रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण फाऊंडेशनच्या वतीने हा पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. 

 कुंभारगाव विभागातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सचिन पवार तडसरकर, कला व सामाजिक क्षेत्रात अनेक वर्ष मॅकेनिकचे उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल माणिक खटावकर मिस्त्री. यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. समाजाभिमुख नेतृत्व असणारे तसेच शैक्षणिक,सामाजिक धार्मिक क्षेत्रात हिरीरीने भाग घेणाऱ्या लोकांचा यशवंतराव चव्हाण फांऊंडेशन ,मुंबई यांच्या वतीने पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो.

 महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते व मुबंई जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री प्रविण दरेकर व ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. गणेश नाईक यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मान्यवरांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

  यावेळी व्यासपीठावर श्री अनिल गजरे (संचालक,मुबंई जिल्हा मध्यवर्ती बँक व अध्यक्ष, मुंबई जिल्हा सहकार बोर्ड) , श्री ॲड.भरतनाना पाटील (प्रवक्ता ,भाजपा व सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य), श्री आशिष आचरे (सदस्य,जि.प.सातारा), श्रीमती दमयंती आचरे (नगरसेविका,नवी मुबंई ), श्री सुभाष बावडेकर (चेअरमन दि वांगव्हॅली को.ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई), श्री संजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थित हा दिमाखदार पुरस्कार सोहळा संपन्न झाला. 

  सचिन पवार तडसरकर व माणिक खटावकर मिस्त्री यांच्यावर कुंभारगाव विभागातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.