श्री संतकृपा डी.फार्मसी च्या विद्यार्थ्यांची हॉस्पिटल व आयुर्वेदिक मेडिकल व्हिजीट.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी [ डी.फार्मसी] घोगाव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नुकतीच हॉस्पिटल व आयुर्वेदिक मेडिकल व्हिजीट पार पडली आहे . 
सध्याच्या कोविडच्या विविध संकटामुळे शिक्षण प्रणाली हि खूप विस्कळीत झाली आहे. पण श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ डी. फार्मसी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सातत्याने अशा संकटावर मात करून विद्यार्थ्यांना पुढे नेहण्याचा प्रयत्न करत असते. म्हणूनच विद्यार्थ्यांना प्रत्याक्षिक अभ्यासक्रमानुसार त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी याकरिता प्रत्यक्ष ग्रामीण रुग्णालय उंडाळे येथे भेट देऊन तेथील क्ष-किरण, औषधनिर्माण, अत्यावश्यक, बाह्य रुग्ण, अंतर रुग्ण अशा विविध कक्षाची माहिती देण्यात आली.
या वेळी डॉ. कोगळूनकर, डॉ. दाभोळे आणि औषध निर्माण अधिकारी रणजीत जोंघाळ यांनी मार्गदर्शन केले.


तसेच कराड येथील बागवान मेडिकल येथे विद्यार्थ्यांना  औषधांचे महत्व, आयुर्वेदिक औषधीय कंपन्या व विविध  उत्पादने या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी असरार बागवान यांनी आयुर्वेदिक चूर्ण, तेल, काढा, सिरप, शाम्पू, गुटिका यांची माहिती दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.