धनगर समाज नेते प्रताप बंडगर यांना "मुंबई भूषण" पुरस्कार प्रदान


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  पुण्यश्लोक फाऊंडेशन व धनगर माझा परिवार महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मुंबईत कार्यरत असलेल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील १० नामवंत व्यक्तींचा मुंबई भुषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व धनगर समाज नेते प्रताप बंडगर यांना हा पुरस्कार मिळाला.बंडगर यांचे दोन्ही क्षेत्रातील योगदान पाहुन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

हा पुरस्कार श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर ( इंदूर ) १६ वे आणि संत बाळु मामा मालिकेतील संत बाळु मामांची भूमिका करत असलेला अभिनेता सुमित पुसावळे यांच्या हस्ते प्रताप बंडगर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील कुर्ला बंटर भवन याठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.यावेळी बंडगर यांना मुंबई भुषण पुरस्कार मिळाल्यामुळे समाजातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज