पर्यावरण वाचले तरच गाव वाचेल  म्हणूनच वृक्षसंवर्ध काळाची गरज: सरपंच रवींद्र माने.


  तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

   मान्याचीवाडी ता.पाटण येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून जनजागृती केली. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी या रॅलीतून सायकलसह सहभागी झाले होते. वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन, पाण्याचा वापर, अपारंपारिक ऊर्जा वापर, घनकचरा व्यवस्थापन, हरीत अच्छादन, सांडपाणी व्यवस्थापन, जैवविविधता आदिंबाबत या सायकल रॅलीतून  ग्रामस्थांमध्ये प्रबोधन केले.     यावेळी सरपंच रवींद्र माने, ग्रामसेवक प्रसाद यादव, दूध संस्थेचे चेअरमन सर्जेराव माने, मुख्याध्यापक किशोर बनसोडे, के.एस. खर्डे  आदिंची उपस्थिती होती. सरपंच माने यांनी पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी गावात विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत त्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्यावे असे सांंगून पर्यावरण वाचले तरच गाव वाचेल  म्हणूनच वृक्षसंवर्धन गरजेचे असल्याचे सांगितले.  वसुंधरा अभियान अंतर्गत अग्नी, वायू, जल, प्रथ्वी आणि आकाश या पंचतत्वांबाबत विद्यार्थी आणि ग्रामस्थांना माहीती देऊन हे अभियान यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले.

Popular posts
अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद, शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
इमेज
"मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब." माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच खोचक ट्विट
इमेज
राज्यात शिंदे सरकार येणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, फडणवीस मंत्रिमंडळात नाहीत
इमेज
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदा सोबतच आमदारकीचाही राजीनामा ; बंडखोर आमदारांवर शेवटच्या भाषणातही खेद.
इमेज
एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ
इमेज