काकासाहेब चव्हाण कॉलेज,तळमावले येथील ज्यु .विभाग सायन्सकडे इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे व संजीवन प्रतिष्ठान कुंभारगावचे सचिव या पदावर कार्यरत असणारे समाजाभिमुख नेतृत्व असणारे तसेच शैक्षणिक,सामाजिक धार्मिक क्षेत्रात हिरीरीने भाग घेणारे तसेच शैक्षणिक,सामाजिक धार्मिक, राजकीय क्षेत्रातील कार्यक्रमात उत्कृष्ट सुत्रसंचालन करणारे प्रा. सचिन बसाप्पा पुजारी सरांना यशवंतराव चव्हाण फांऊंडेशन ,मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातुन - दि.४ डिसेंबर २०२१ रोजी नवी मुबंई या ठिकाणी - 'यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक ' पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते व मुबंई जिल्हा बँकेचे अध्यक्ष - सन्मानीय मा श्री प्रविण दरेकर साहेब व ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा श्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर श्री अनिल गजरे (संचालक,मुबंई जिल्हा मध्यवर्ती बँक व अध्यक्ष, मुंबई जिल्हा सहकार बोर्ड) , श्री ॲड.भरतनाना पाटील (प्रवक्ता ,भाजपा व सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य), श्री आशिष आचरे (सदस्य,जि.प.सातारा), श्रीमती दमयंती आचरे (नगरसेविका,नवी मुबंई ), श्री सुभाष बावडेकर (चेअरमन दि वांगव्हॅली को.ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई), श्री संजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थित हा दिमाखदार पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी सचिन पुजारी आपल्या मनोगतात म्हणाले कि, आधुनिक महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री आदरणीय स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने दिला जाणार हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे, कारण यशवंतराव चव्हाण हे एक व्यक्ती नसुन तो एक विचार ,संस्कार व देशाला दिशा देणारे व सर्वांचे आदर्श मार्गदर्शक आहेत याचा आपल्या सर्वांना गर्वच आहे. या पुरस्काराने माझी शैक्षणिक क्षेत्रातील नैतिक जबाबदारी वाढली आहे याला कोठेही तडा जाणार नाही व तळागाळातील, सर्वसामान्य जनतेच्या विद्यार्थांचा विचार करून येणाऱ्या भविष्यकाळात देखील मी चांगल्या पध्दतीने व प्रामाणिक पणे माझी भुमिका पार पाडण्याचा प्रयत्न करणे तसेच समजात प्रत्येकाला जी जी मदत लागले ती ती मदत करण्याची भावना माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करणार .
या पुरस्कारासाठी यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन मुंबईचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत बापु व त्यांच्या टिमचे मी मनपूर्वक हार्दिक आभार न मानता त्यांच्या ऋणात रहाणे मी नेहमी पसंत करतो असे मी माझ्या मनोगतात भावना व्यक्त केल्या.
यावेळी सचिन पुजारी यांना प्राचार्य अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर ) , सौ प्राचार्य शुभांगीताई गावडे (सचिव,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर ) , श्री एस के कुंभार सर (माजी सहसचिव अर्थ ), प्राचार्य आर के भोसले सर (सहसचिव प्रशासन) , श्री संजय देसाई (माजी शिक्षण,अर्थ सभापती जि प सातारा), प्राचार्य डॉ अरुण गाडे , श्री सर्जेराव यादव साहेब (उद्योजक इस्लामपुर) , श्री इंद्रजित देशमुख (माजी प्रशासकीय अधिकारी), मा प्रतापभाऊ देसाई (उपसभापती,पाटण पं.स ) , डॉ दिलीपराव चव्हाण (माजी चेअरमन लोकनेते बा. दे.सह साखर कारखाना मरळी), श्री शेखर चरेगांवकर (माजी अध्यक्ष सहकार परिषद) शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केेले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.