जागतिक माती दिनाच्या निमित्ताने, सह्यपुत्र परिवाराने सर केला मोरोशीचा 'भैरवगड'


सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखण्याची आवड निर्माण व्हावी, दुर्गभ्रमंती, व्याख्यान आणि दुर्गसंवर्धन करण्यासाठी महाराष्ट्रातील, अगदी कमी अवधी मध्ये ट्रेकर्स मंडळींच्या पसंतीस उतरलेले. 'सह्यपुत्र परिवार' ने दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजी, जागतिक माती दिनाच्या निमित्ताने; बहुचर्चित असलेल्या थरारक भैरवगडचे गिर्यारोहण आयोजित केले होते. सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे झाली आहे. लाव्हरसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लाव्हारसाचे थर एका वर एक थर जमत गेले. त्यानंतर उन, वारा, पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. त्यापैकी एक रचना म्हणजे "प्रस्तर भिंती"; ही रचना आपल्याला भैरवगडा वरती पहायला मिळते. मातीशी नाती सांगणारे सह्याद्रीचे सुपुत्र मुंबई आणि हुन आपल्या मातीला नमस्कार करण्यासाठी भैरवगडावर गिर्यारोहण करण्यास दुसऱ्या प्रहरी मोरोशी या गावी पोहोचले. "पहाटे - पहाटे दुर्गभ्रमंतीस सुरुवात झाली.सातवाहन कालीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या भैरवगडावर सर्वच सह्यपुत्र चढाई करण्यास मनात उत्सुकता ठेवून मजल दर मजल करत होते. बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी वेळेत मंडळी पोहोचली परंतु अगोदरच आणखी एक समुह असल्याने आम्हाला प्रतिक्षा करावी लागणार होती. गिर्यारोहणाची संपुर्ण जबाबदारी गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या श्री. रोहिदास कोरडे यांनी सांभाळली. बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी बसलेले असताना आमच्यातील एका सह्यकन्येच्या मस्तकावर गडावरून आलेला छोटासा खडा पडला आणि किरकोळ जखम झाली परंतु प्रथमोपचार पेटी उपलब्ध असल्याने त्यांच्यावर उपाय करण्यात आले. अखेर सकाळी ११ वाजता सह्यपुत्र परिवाराच्या सदस्यांची चढाईला सुरुवात झाली.बालेकिल्ल्याच्या माथ्यावरच्या मातीला नमस्कार करुन, कपाळी लावत, चित्त थरारक प्रसंगाच्या अनुभवाचे धनी झालेले आम्ही दुपारी ठीक 3 वाजता बालेकिल्ला उतरलो. प्रत्येकाला भुक लागली होती त्यामुळे सर्वच वाट मिळेल तशी पाऊले उचलत होते. जेवणाची व्यवस्था मोरोशी येथीलच महामार्ग लगत असणाऱ्या हॉटेल 5 स्टार येथे होती.साधारणपणे सायंकाळी ५ वाजता दुपारचे जेवण सुरु झाले. उत्तम दर्जाच्या जेवणाने थकवा शांत केला.वेळे अभावी सांगता आणि अभिप्राय समारंभ घेता आला नसला तरी प्रत्येक सह्यपुत्राने सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली मते मांडली आहेत.सह्यपुत्र परिवाराच्या मुख्य हेतु पैकी 'गडाचा इतिहास आणि जागृती पर व्याख्यानाचा' भाग होऊ शकला नाही याची खंत आम्हाला आहे परंतु पुढील ट्रेक वेळी त्याची भर आम्ही नक्की काढू. तसेच पुढील ट्रेक लवकरच जाहीर करण्यात येईल " असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सह्यपुत्र परिवाराच्या सदस्यांनी सांगितले. या मोहिमेचे यशस्वी आयोजन, प्रणित भेरे(शहापूर), नितेश भेरे (टिटवाळा), अंकिता शिंदे (पुणे), अनिकेत शेलार (डोंबिवली) आणि नवनीत यशवंतराव (किन्हवली) यांनी केले होते.