कुंभारगाव येथे श्री शंभो महादेव पिंडीची प्रतिष्ठापना संपन्न.

कुंभारगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:           
 कुंभारगाव ता पाटण येथे श्री शंभो महादेव पिंडीची प्रतिष्ठापना श्री.ष.ब्र.108 डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज (तीर्थक्षेत्र, आदिमठ संस्थान धारेश्वेवर )यांचे हस्ते व कराड दक्षिण चे आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई या मान्यवरांच्या उपस्थितीत शंभो महादेव पिंडीची प्रतिष्ठापना विधीवत संपन्न झाली.
यावेळी मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. भारतीय हिंदू संकृती प्रमाणे "साधू संत येती घरा "तोची दिवाळी दसरा याची प्रचिती आली.

या श्री शंभूमहादेव पिंडीची स्थापनेसाठी दि 26/12/2021 रोजी दोन दाम्पत्याचे हस्ते विधिपूर्वक मूर्ती उच्चाटन करण्यात आले दि 7/12/2021रोजी गावातून पिंडीची भव्य मिरवणूक ग्रामप्रदक्षणा टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली. यानंतर श्री शंभू महादेवाची पिंड मंदिरात, जलवास, धान्यवास, निद्रावास विधी करण्यासाठी मंदिरात ठेवण्यात आली बुधवार दि. 8/12/2021 रोजी सकाळी 7 दाम्पत्यांना पिंड स्थापनेच्या विधीसाठी बसवण्यात आले. सकाळी 6ते 9 श्री गणेश पूजन, स्वस्तिपुण्याहवाचन, नांदी, समाराधना, होमहवन, 9 ते 12, श्री महादेव पिंडीची स्थापना, त्या सोबत नागदेवता, कासव याचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. 

       या नंतर भाविक भक्त यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा धार्मिक विधी कुंभारगावचे रामचंद्र स्वामी (जंगम)यांचे मार्गदर्शना खाली ओमपंच्चाक्षर, जंगमपौर हत्ते मंडळ महाराष्ट्र या 11 स्वामीचे हस्ते पार पडला या प्रतिष्ठापने वेळी कुंभारगाव परिसरातील भाविक भक्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्षारोपन कार्यक्रमा वेळी श्री.ष.ब्र.108 डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज समवेत लोकनेते बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, राजेंद्र पुजारी, विजय कचरे,राजाराम नरुले, प्रमोद स्वामी, मनोज कचरे व वैभव चव्हाण उपस्थित होते.

वृक्षारोपन कार्यक्रमा वेळी गृहराज्यमंत्री ना शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, डॉ.दिलीपराव चव्हाण, कुंभारगावचे उपसरपंच राजेंद्र चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.