उंडाळे.. स्वच्छता करताना विद्यार्थी
उंडाळे|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी गावातील सार्वजनिक ठिकाणे, मंदिर, शाळा परिसर स्वच्छ करून नववर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.
येथील विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने वर्षभर विविध सण, उत्सव अनोखे उपक्रम राबवून साजरे केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यालयाचे प्राचार्य, बी. आर. पाटील, पर्यवेक्षक जे. एस माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील उपशिक्षक धनंजय पवार, शंकर आंबवडे यांच्या सूचनेनुसार इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी नववर्षाच्या निमित्ताने विद्यालय परिसर, क्रांती चौक, हनुमान मंदिर, महादेव मंदिर तसेच गावातील प्रमुख रस्त्यांचे स्वच्छता करून अनोख्या उपक्रमात भर घातली.