खा.श्रीनिवास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

खा.श्रीनिवास पाटील यांचेविशेष प्रयत्नातून तळागाळात विकासकामे पोहचवली जात असून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांची कटिबद्धता त्यांच्याकडून पूर्णत्वास जात आहे, असे मत राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले.

    पाटण तालुक्यातील सलतेवाडी, वाझोली, डाकेवाडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे, तळमावले येथे पुर्नवसीत घोटील गावातील अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे, मंद्रुळकोळे येथे अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे अशा विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

        सारंग पाटील म्हणाले, खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामांना सुरूवात झाली आहे. त्यांच्या प्रयत्नातून तळागाळातील नागरिकांपर्यंत निधी पोहचवला जात आहे. त्यानुसार ढेबेवाडी-कुंभारगाव परिसरात अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. या परिसरातील गावांमध्ये रस्ते, लाईट, पिण्याच्या पाण्याची सुविधा, साकवपूल, पाणंद रस्ते, अंतर्गत गटर बांधकाम, शाळा दुरुस्ती, स्मशान भूमी उभारणे अशी अनेक विकासकामे खा.श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून साकरली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सलतेवाडी,डाकेवाडी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता मात्र तो खा.पाटील यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे. तसेच पुनर्वसन झालेल्या घोटील व मंद्रुळहवेली येथील अंतर्गत रस्त्याचा प्रश्नही मार्गी लागल्याने नागरिकांची अनेक दिवसापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. खा.पाटील यांच्या प्रयत्नातून भरीव निधी उपलब्ध होत असल्याने लोकांची मागणी व त्यांच्या समस्या प्राधान्याने सुटत आहेत.       

तसेच यावेळी वेणूताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट कराडच्या विश्वस्थ पदी निवड झाल्या बदल सारंग पाटील यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपास्थित सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हापरिषद शिक्षण, अर्थ, क्रिडा सभापती संजय देसाई, जनसहकार निधीचे संस्थापक अध्यक्ष मारुतीराव मोळावडे, पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती रघुनाथ जाधव, दि सह्याद्री सह बँक मुंबई व्हा.चेअरमन सुरेश पवार, संजय भुलुगडे, पाटण अर्बन बँकचे संचालक अंकुश मोंडे, स्वीय सहाय्यक दादासाहेब नांगरे पाटील, प्रा.सचिन पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश पवार यांनी केले तर आभार तळमावले च्या सरपंच सौ. शोभा भुलुगडे यांनी मानले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ बहुसंखेने उपस्थित होते.