तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
तळमावले तालुका पाटण येथील आदर्श संस्कार कॉम्पुटर च्या वतीने कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून मिळतील. सदर योजनेचे फॉर्म भरण्यासाठी कोणतीही फी किंवा पैसे घेतले जाणार नाहीत
50 हजार मिळणार याचा आनंद नाही पण घरातील माणूस गेला त्याची किंमत त्याच्या घरातील लोकांनाच माहीत.पण तरी काही तरी मदत म्हणून फुल नाही फुलाची पाकळी मिळेल यासाठी फॉर्म भरून घ्यावे असे आवाहन संतोष पवार यांनी केले आहे. याकरिता खालील आवश्यक कागदपत्रे फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे
1.अर्जदाराचा मोबाईल नंबर
2.अर्जदाराचे आधार कार्ड
3. मृत व्यक्तीचे आधार कार्ड
4.मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र
5.अर्जदाराचे आधार लिंक असलेल्या बँकेचा खाते क्रमांक आणि कॅन्सल्ड चेक कॉपी
6.मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
7.कागदपत्र क्रमांक सहा उपलब्ध नसल्यास मृत व्यक्तीचा RT-PCR report copy OR CT Scan copy OR Any other Medical Documents
आमच्या खालील कोणत्याही केंद्रावर मोफत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
संपर्क - श्री.संतोष शामराव पवार (सर)
मो- 9823385240/7588539037
आदर्श संस्कार कॉम्प्युटर्स, तळमावले
पत्ता: कुंभारगाव रोड, तळमावले ता.पाटण जि. सातारा
पत्ता: पोस्ट ऑफिसशेजारी, नाईकबा रोड, हॉटेल सुजाता समोर, ढेबेवाडी ता.पाटण, जि. सातारा
पत्ता: जिल्हा बँकेजवळ, बाजार तळ, सणबुर, ता.पाटण, जि. सातारा
पत्ता: पोस्ट ऑफिसशेजारी, मेन रोड, ग्रामपंचायत समोर, काळगाव ता.पाटण, जि. सातारा