मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मुंबईतील बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आणि वॉर्ड क्रमांक १५३ चे लोकप्रिय नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या विद्यमाने चेंबूरमध्ये प्रथमच खास महिला आणि मुलींसाठी एकदिवसीय मोफत कराटे - आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
चेंबूरच्या घाटले म्युनिसिपल शाळेच्या बाजूला असलेल्या खुल्या व्यायाम मैदानात भरविण्यात आलेल्या या शिबिराला परिसरातील महिला व मुलींनी चांगला प्रतिसाद दिला.यावेळी आयडीयल मार्शल आर्ट अध्यक्ष सत्यजित जाधव, आयडीयल मार्शल आर्ट श्री प्रविण रूपवते, शिवसेना शाखाप्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा संघटीका अनिता महाडिक, लोकप्रिय समाजसेविका मिनाक्षी पाटणकर, शिवसेना कार्यालय प्रमुख मारूती वाघमारे, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, बालवीर स्पोर्ट्स क्लब पदाधिकारी, शिवसेना महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.