आयुर्वेद उपचार काळाची गरज : सौ. सारिका पाटणकर.

 

आयुर्वेदिक दवाखान्याचे उद्घाटन करताना कुंभारगाव च्या सरपंच सौ सारिका पाटणकर व इतर मान्यवर.
कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

वैद्यकीय उपचार पद्धती मध्ये आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे अगदी प्राचीन काळापासून आयुर्वेदाचे महत्त्व सर्वांना पटले आहे. पूर्वी खेडोपाडी हॉस्पिटलची उपलब्धता नव्हती त्यावेळी सर्व रोगांवर आयुर्वेदिक उपचार केले जात होते.त्यामुळे ‌ लोकांचे आरोग्य निरोगी राहत असे. आज ही आयुर्वेद आपले महत्त्व टिकवून आहे आयुर्वेद उपचार पद्धती आज ही काळाची गरज आहे. आपल्या उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचार मोलाची भूमिका बजावत असते असे प्रतिपादन कुंभारगाव च्या सरपंच सौ सारिका पाटणकर यांनी केले. 

जांभुळवाडी (कुंभारगाव) तालुका पाटण येथील आयुर्वेद दवाखान्याचा शुभारंभ सरपंच सौ सारिका पाटणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती संजय देसाई, राजे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेशजी पाटणकर, पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश मोरे, कुंभारगाव चे उपसरपंच राजेंद्र चव्हाण, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कुंभारगावचे प्रतिष्ठित नागरिक शंकरराव चव्हाण, प्रकाश देसाई, युवराज चव्हाण, प्रदीप देसाई तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. टिकेकर मॅडम, डॉ.उमेश गोंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना सौ. सारिका पाटणकर म्हणाल्या जांभुळवाडी व परिसरातील वाड्या वस्त्यासाठी येथील जनतेसाठी आज आयुर्वेदाचे वैद्यकीय दालन सुरू केले आहे. अनेक वर्ष हे वैद्यकीय केंद्र बंद होते. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांनी व राजे संघर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष योगेशजी पाटणकर यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे व सहकार्यामुळे आज ही अनेक वर्षे बंद असलेले वैद्यकीय केंद्र पुन्हा नव्याने जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होत आहे याचा खरा आनंद होत आहे. जनतेने आपल्या उत्तम आरोग्यासाठी या आयुर्वेद दवाखान्यात उपचार करावेत असे आवाहन त्यांनी येथील जनतेला केले. हा दवाखाना नव्याने सुरू व्हावा येथील जनतेची वैद्यकीय अडचण दूर व्हावी याकरिता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक सत्यजित पाटणकर यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल व सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समाजसेवक व राजे संघर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष योगेशजी पाटणकर म्हणाले गेली अनेक वर्षे बंद असलेला येथील आयुर्वेदिक दवाखाना सुरु व्हावा यासाठी शासनाशी केलेला पत्रव्यवहार याचा संदर्भ देऊन युवा नेते सत्यजित पाटणकर यांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख करून त्यांचे आभार व्यक्त केले व कुंभारगाव ग्रामपंचायतीने लोकसेवेसाठी अविरत चालवलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.या आयुर्वेद दवाखान्यासाठी व येथील जनतेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना राजे संघर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष योगेशजी पाटणकर व  व्यासपीठावर इतर मान्यवर.

जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती संजय देसाई उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले प्राचीन काळापासून आयुर्वेदाचे महत्व अधोरेखित झाले आहे. उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचार अतिशय गरजेचे आहे व ती सुविधा येथे पुन्हा नव्याने सुरू झाली आहे याचा गरजूंनी लाभ घ्यावा.

 सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देसाई यांनी केले तर वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोंजारी यांनी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ.सारिका पाटणकर.

Popular posts
अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद, शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
इमेज
"मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब." माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच खोचक ट्विट
इमेज
राज्यात शिंदे सरकार येणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, फडणवीस मंत्रिमंडळात नाहीत
इमेज
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदा सोबतच आमदारकीचाही राजीनामा ; बंडखोर आमदारांवर शेवटच्या भाषणातही खेद.
इमेज
एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ
इमेज