पत्रकार सुरेश मस्कर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने पत्रकारिता विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मस्करवाडी (काळगांव) येथील पत्रकार सुरेश मस्कर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार लोकनेते मा गणेशसाहेब नाईक यांचे हस्ते सन्मानित करण्यात आला.

पत्रकार सुरेश मस्कर हे विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. लोटळेवाडी येथील श्री स्वामी समर्थ सेवाश्रम मठाचे संस्थापक/अध्यक्ष असुन मठ उभारणी मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच गावातील विविध धार्मिक कार्यामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात.

पत्रकार सुरेश मस्कर यांच्या पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष संजय सावंत व कार्यकारी अध्यक्ष सुभाषराव बावडेकर यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने यशवंतराव चव्हाण पुरस्कार देवुन गौरव केला.

त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular posts
अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद, शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
इमेज
"मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब." माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच खोचक ट्विट
इमेज
राज्यात शिंदे सरकार येणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, फडणवीस मंत्रिमंडळात नाहीत
इमेज
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदा सोबतच आमदारकीचाही राजीनामा ; बंडखोर आमदारांवर शेवटच्या भाषणातही खेद.
इमेज
एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ
इमेज