कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन 2021- 22 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील गावांसाठी 9 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून नळ पाणीपुरवठा योजनेच्या सुधारात्मक पुर्नजोडणी करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती येणार आहे.
कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथे अस्तित्वातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारात्मक पुर्नजोडणी करण्याच्या कामासाठी 24 लाख 71 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याच पध्दतीच्या कामानुसार अंबवडे ( संमत) कोरेगाव येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 44 लाख 8 हजार.
सातारा तालुक्यातील खोडद येथील योजनेसाठी 29 लाख 86 हजार, चिंचनेर (सं) निंब येथील योजनेसाठी 59 लाख 85 हजार, बोरगाव येथील योजनेसाठी 1 कोटी 63 लाख 9 हजार,
कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथील योजनेसाठी 1 कोटी 11 लाख 44 हजार, हेळगाव येथील योजनेसाठी 1 कोटी 21 लाख 15 हजार, कामथी येथील योजनेसाठी 40 लाख 67 हजार, शामगाव येथील योजनेसाठी 42 लाख 4 हजार, शेळकेवाडी (म्हासोली) येथील योजनेसाठी 24 लाख 98 हजार, शिंदेवाडी (विंग) योजनेसाठी 24 लाख 95 हजार, भवानवाडी येथील योजनेसाठी 23 लाख, पाचुंद येथील योजनेसाठी 23 लाख 65 हजार,
पाटण तालुक्यातील नुने येथील योजनेसाठी 1 कोटी 15 लाख 93 हजार, कुठरे येथील योजनेसाठी 24 लाख 66 हजार, बहुले येथील योजनेसाठी 24 लाख 21 हजार, चाळकेवाडी येथील योजनेसाठी 18 लाख 63 हजार, कळकेवाडी येथील योजनेसाठी 15 लाख 91 हजार, घोटील वरचे येथील योजनेसाठी 24 लाख 68 हजार, लुगडेवाडी येथील योजनेसाठी 23 लाख 73 हजार, आंबळे येथील योजनेसाठी 20 लाख 95 हजार असा भरीव निधी मंजूर झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.