ओमायक्रॉन मुळे महाराष्ट्राची चिंता वाढली ; ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 8 वर.

 

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा 1 रुग्ण आढळला होता. यामध्ये आता आणखी सात जणांची भर पडली आहे. पिपंरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता आठ झाली आहे.