पाटण तालुक्यातील विकासकामांसाठी 3 कोटी

खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामे मार्गी.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
    खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून पाटण तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 3 कोटी 34 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून मंजूर झालेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

    मोरगिरी, आडदेव, आंबळे, बेलवडे खुर्द, सांगवड इजिमा 135 रस्‍ता सा.क्र.3/00 ते 5/00 सुधारणा करणे (भाग आडदेव ते आंब्रळे रस्‍ता) 38 लक्ष रुपये, काठीटेक, चाफोली, दिवशी खु., चिटेघर, केर रस्‍ता इजिमा 133 सा.क्र. 20/00 ते 22/00 सुधारणा करणे 37.63 लक्ष रूपये मंजूर झाले आहेत.

डेरवण, हरिजनवस्‍ती रस्‍ता ग्रामा 129 सा.क्र.2/00 ते 3/500 ग्रामा 129 सुधारणा करणे 8 लक्ष, वरचे केर ते खालचे केर जोड रस्‍ता ग्रामा 385 सुधारणा करणे 8 लक्ष, तारळे, जंगलवाडी, फडतरवाडी, बोर्गेवाडी ग्रामा 42 पाबळवाडी ते प्रजिमा 37 रस्‍ता सुधारणा करणे 10 लक्ष, मणदुरे रस्‍ता ते वरची मेंढोशी माऊलीनगर ग्रामा 78 रस्‍ता सुधारणा करणे 8 लक्ष, बनपूरी, आंबवडे, कोळेकरवाडी ग्रामा 307 रस्‍ता सुधारणा करणे 8.47 लक्ष,

मोरगिरी, आडदेव, आंबळे बेलवडे खुर्द, सांगवड इजिमा 135 रस्‍ता ते इजिमा 136 रस्‍ता (भाग आडदेव ते आंब्रळे रस्‍ता) सा.क्र.3/00 ते 5/00 37.63 लक्ष, काठीटेक, चाफोली, दिवशी खु., चिटेघर केर रस्‍ता इजिमा 133 सा.क्र. 20/00 ते 22/00 सुधारणा करणे 37.63 लक्ष, बिबी, मकाईचीवाडी रस्‍ता सा.क्र. 0/00 ते 1/500 ग्रामा 103 सुधारणा करणे 10 लक्ष,

कुंभारगांव (मान्‍याचीवाडी) ते चिखलेवाडी (मोरेवाडी) स्‍मशानभुमी सा.क्र. 0/00 ते 2/400 रस्‍ता सुधारणा करणे 10.64 लक्ष, आंबवडे, कोळेकरवाडी ग्रामा 307 रस्‍ता सुधारणा करणे 8.00 लक्ष रूपये मंजुर झाले आहेत.

जनसुविधा व नागरी सुविधा ‘क’ वर्ग पर्यटन स्‍थळे आदी योजनेतून मंजूर झालेली कामे अशी बनपुरी, हनुमान वार्ड शाळा खोल्‍या बांधणे 8.96 लक्ष रूपये , पेठशिवापूर येथे शाळा खोल्‍या बांधणे 8.96 लक्ष, मारुल हवेली येथे स्‍मशानभूमिसाठी संरक्षक भिंत बांधणे 8 लक्ष रुपये, रासाटी येथे शाळा खोल्‍या बांधणे 8.96 लक्ष, साखरी येथे शाळा खोल्‍या बांधणे 8.96 लक्ष, आडदेव येथे नवीन अंगाणवाडी बांधणे 8.50 लक्ष, मारुल हवेली भक्‍त निवास बांधणे 10 लक्ष, म्‍हावशी येथे ग्रामपंचायत रोड ते स्‍मशानभूमि पर्यंतचा रस्‍ता करणे 8.00 लक्ष, कोळेकरवाडी येथे स्‍मशानभूमिसाठी निवारा शेड बांधणे 4 लक्ष,

मल्‍हारपेठ येथे भाजी मंडई ते स्‍मशानभूमि रस्‍ता खडीकरण व डांबरीकरण करणे 4 लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सदर निधी मंजूर झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.