कराड तालुक्यातील विकासकामांसाठी 2 कोटी 79 लक्ष

खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर

कराड  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
    खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 79 लाख रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून मंजूर झालेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

   कराड, येवती, घराळवाडी, मस्‍करवाडी, चव्‍हाणवाडी, धामणी, डाकेवाडी, निवी रस्‍ता इजिमा 130 रस्त्याची सुधारणा करणे 32.01 लक्ष रुपये,

कराड तालुक्यातील गोटेवाडी, भरेवाडी, जोडरस्‍ता साक्र 0/00 ते 2/00 ग्रामा 296 सुधारणा करणे 36.00 लक्ष,

रा.मा.142 ते शेरे व्‍हाया केळेबावी वसाहत रस्‍ता साक्र 0/00 ते 2/00 ग्रामा. 224

सुधारणा करणे 16 लक्ष,

साजुर, सटवाई वस्‍ती, गमेवाडी, डेळेवाडी रस्‍ता भाग गमेवाडी, डेळेवाडी ग्रामा 148 सुधारणा करणे 15 लक्ष,

जिंती ते पाचंब्री रस्‍ता ग्रामा 305 साक्र 0/00 ते 1/500 ग्रामा 305 सुधारणा करणे 17 लक्ष, 

बेलवडे बु. ते वाटेगाव सांगली जिल्‍हा हद्द रस्‍ता ग्रामा 314 साक्र 0/00 ते 0/900 ग्रामा 314 सुधारणा करणे 15.59 लक्ष,

सदाशिवगड, विरवडे ते करवडी रस्‍ता ग्रामा 117 साक्र 1/00 ते 2/00 ग्रामा 117 सुधारणा करणे 15 लक्ष, 

धावरवाडी, पाल रस्‍ता ग्रामा 4 साक्र 0/00 ते 2/500 ग्रामा 04 सुधारणा करणे 20 लक्ष,

माटेकरवाडी रा.मा.144 शेवाळवाडी, येळगांव ते प्रजिमा 54 रस्‍ता सा.क्र.0/00 ते 2/00 सुधारणा करणे 10 लक्ष,

उंडाळे मनू रस्‍ता सा.क. 3/00 ते 4/00 सुधारणा करणे 5 लक्ष,

जनसुविधा व नागरिसुविधा ‘क’ वर्ग पर्यटन स्‍थळे आदी योजनेतील मंजुर कामानुसार कराड तालुक्यातील खोडशी येथे शाळा खोल्‍या बांधणे 8.96 लक्ष,

चिखली येथे शाळा खोल्‍या बांधणे 8.96 लक्ष,

नवीन कवठे येथे शाळा खोल्‍या बांधणे 8.96 लक्ष,

टेंभू गाव अंतर्गत रस्‍ते कॉंक्रेटीकरण करणे 4 लक्ष, 

पाडळी (बालाजीनगर) येथील कराड-चिपळूण मार्ग ते बालाजीनगर अॅप्रोच रस्‍ता खडीकरण व डांबरीकरण करणे 4 लक्ष,

बेलदरे नाईकबा मंदीराकडे जाणारा रस्‍ता कॉंक्रेटीकरण करणे 4 लक्ष, 

बनवडी थोरातवस्‍ती ते ओढ्या पर्यंत बंदीस्‍त गटर्स काढणे व डांबरीकरण करणे 3 लक्ष, 

उंब्रज सैनिक बॅंक ते बौध्‍दवस्‍ती पर्यंतचा रस्‍ता करणे 5 लक्ष,

रेठरे बुद्रुक येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लक्ष,

कोयना वसाहत येथे बंदीस्‍त गटर्स बांधणे 4 लक्ष,

सैदापूर कृष्‍णा कॅनॉल पथ रस्‍ता गोवारे रेाड कराड-विटा महामार्ग ते गोवारे पर्यंतचा रस्‍ता खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लक्ष,

वारुंजी येथे मराठी शाळा ते जुने गाव व भरतनगर येथील अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लक्ष,

पाल येथे अंतर्गत आर.सी.सी गटर्स करणे 5 लक्ष,

साजूर येथे महादेव मंदीर भक्‍त निवास बांधणे 8 लक्ष, 

मौजे पाडळी येथे साठवण बंधारा बांधणे 16.81 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.