डॉ.संदीप डाकवेंकडून विद्यानृसिंह भारती यांना 11,111 वे पेंटींग प्रदान


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

कोल्हापूर येथील करवीर पीठाचे मठाधिपती विद्यानृसिंह भारती यांना डॉ.संदीप डाकवे यांनी 11,111 वे पेंटींग प्रदान केले आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा चित्रकार डॉ.डाकवे यांनी कलाकृती भेटीचा छंद जोपासला आहे. नुकतेच त्यांनी मठाधिपती विद्यानृसिंह भारती यांना 11,111 वे पेंटींग प्रदान केले. मठाधिपती यांनी डॉ.डाकवे यांच्या कलात्मक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या डॉ.डाकवेंच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये तीनदा तर ‘हायरेंज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये एकदा झाली आहे. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम राबवले आहेत. नुकतीच त्यांची दूरदर्शन वाहिनीवर प्रदीर्घ मुलाखत प्रसिध्द झाली आहे. डॉ.संदीप डाकवे यांची 4 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आतापर्यंत चित्र भेटी दिलेल्या निवडक आठवणींचे ‘ग्रेट स्केच भेट’ या नावाचे पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. भविष्यामध्ये ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ यामध्ये नाव नोंदवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

___________________________________

आतापर्यंत कलाकृती दिलेल्या ग्रेट भेटी :

100 वे चित्र अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर, 500 वे पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे, 100 वे अभिनेते भरत जाधव, 2000 वे अभिनेते सुबोध भावे, 3000 वे अभिनेत्री अश्विनी महांगडे, 4000 वे पार्श्वगायिका कविता राम, 5000 वे एसपी तेजस्वी सातपुते, 6000 वे पत्रकार हरीष पाटणे, 7000 वे एसपी अजयकुमार बन्सल, 8000 वे आरटीओ तेजस्विनी चोरगे, 9000 वे ज्योतिष विशारद सतीश तवटे, 10000 वे अभिनेता रोहन गुजर यांना दिले आहे.

___________________________________