वडगाव गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध :ना.बाळासाहेब पाटील

विविध विकास कामाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
वडगाव येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन सहकार व पणन मंत्री ना.बाळासाहेब पाटील व खा. श्रीनिवास पाटील यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.

यावेळी बोलताना ना. बाळासाहेब पाटील म्हणाले की वडगाव गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे या गावाच्या विकासकामात काही कमी पडणार नाही. या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की सरपंच रणजित पाटील व संभाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली ॲड. विनायकराव पाटील बापू जनसेवा संघटनेचे व विकास सेवा सोसायटीचे काम उत्तमरीत्या सुरू आहे . त्यांच्या या कामाबद्दल त्यांचे कौतुक आहे.

यावेळी सातारा जिल्ह्याचे खा. श्रीनिवास पाटील बोलताना म्हणाले की विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे माझ्या परीने लागेल तेवढा निधी मी वडगाव गावासाठी देण्यासाठी कटिबद्ध आहे.

या वेळी सातारा जिल्हा अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे , सभापती प्रणव ताटे, तानाजीराव साळुंखे री उपयुक्त स्टेट एक्साईज, चंद्रकांत जाधव आप्पा, सौ संगीता ताई साळुंखे ,सौ सुरेखा ताई जाधव, जी प सदस्य, कारखान्याचे सर्व संचालक, परिसरातील सर्व आजी माजी सरपंच, उप सरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायटी आजी माजी चेअरमन सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते .



सरपंच परिषद पुणेचे कार्याध्यक्ष रणजित पाटील आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की ना.बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून वडगाव मध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे गेल्या पाच वर्षात साकार झाली यामध्ये प्रामुख्याने वडगाव पाली रोड, गावामध्ये सुसज्ज व्यायामशाळा, वडगाव गावातील अंतर्गत रस्ता, वडगाव भांबे रोड, स्मशानभूमी रस्ता,मातंग बौद्ध वस्ती , संपूर्ण काँक्रीटीकरण रस्ता, जोतिर्लिंग मंदिर सभामंडप व खा.श्रीनिवास पाटील यांच्या निधीतून गावंतर्गत डांबरीकरण रस्ता अशी विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वडगाव गाव 90% हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभे राहिले व इथून पुढेही संपूर्ण गाव राष्ट्रवादीच्या पाठीशी राहील.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृष्णत जाधव यांनी केले तर आभार विकास आवळे यांनी मानले.