मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : रस्त्यावर पसरणाऱ्या सुक्या कचऱ्याची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने एम पालिका कार्यालयाच्यावतीने आणि भाजपच्या कार्यकुशल नगरसेविका आशाताई मराठे यांच्या विशेष प्रयत्नातून मुंबईतील दुसऱ्या आणि चेंबूरमधील पहिल्या भूमिगत कचरा कुंडीचा लोकार्पण कार्यक्रम चेंबूरमधील सांडूवाडी येथे नुकताच पार
चेंबूरच्या एम पश्चिम पालिका कार्यालयाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे व सहाय्यक अभियंता संतोष निकाळजे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी स्थानिक नगरसेविका आशा मराठे, सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे,सहाय्यक अभियंता संतोष निकाळजे ,सामाजिक कार्यकर्ते सुभाष मराठे,गणेश बागवे तसेच स्थानिक नागरिक व भाजपा महिला पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आशा मराठे म्हणाल्या की,गेल्या दोन वर्षांपासून आम्ही या बंदीस्त कचरा कुंड्या बसविण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करत होतो. रस्त्यावर इतस्ततः पसरणारा कचरा आणि त्यामुळे होणारी रोगराई टाळण्यासाठी अशी कचरा कुंडी गरजेची होती आणि या आमच्या पाठपुराव्याला यश आले.आता याचा वापर योग्यप्रकारे करण्याचे आवाहन आशा मराठे यांनी केले.तर सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी अशा प्रकारच्या भूमिगत कचरा कुंडीचा प्रयोग चार वर्षांपूर्वी गिरगाव चौपाटीवर करण्यात आला होता.त्यानंतर हा चेंबूरमधील दुसरा उपक्रम आहे.स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांच्या पाठपुराव्यामुळे तो लवकरात लवकर अंमलात आणला गेला आहे.