सभासद, ग्राहकांचा प्रतिसाद हाच जन सहकारचा विश्वास‌. जन सहकार निधी चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

 कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

ज्या नावात सहकारा बरोबरच 'जन' आहे, ज्यामध्ये जनसामान्यांचा विश्वास आहे, जनसामान्यांचे हित जोपासले जाते व यातून सहकार जोपासून गरजूची आर्थिक गरज भागवली जाते, उद्योग व्यवसायांना पतपुरवठा करून उभारणीला मदत होते. गरजूंना आर्थिक मदतीचा हात देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी जन सहकार निधी सहकारातील एक खणखणीत नाणे आहे. अवघ्या तीन वर्षात सहकाराचे नियम तंतोतंत पाळून सभासद, व्यापारी, जनसामान्यांचा विश्वास संपादन करून तालुक्यात सहकारात अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावारूपाला आली आहे. 

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर तीन वर्षांपूर्वी सहकार निधी ची मुहूर्तमेढ संस्थेचे चेअरमन मारुतीराव मोळावडे यांनी विभागातील व्यापारी मित्र व सहकारी मित्रांना बरोबर घेऊन रोवली. आज त्यांच्या पारदर्शक कारभाराने व संस्थेतील विविध कर्ज, ठेवी, उपक्रम त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजूंना अर्थ पूरवठा करून उद्योग आणि व्यवसाय उभारणीत सिंहाचा वाटा उचलून बेरोजगारांना व्यवसायासाठी मदतीचा हात दिला व त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.

अल्पावधीतच हे सहकारातील कार्य पाहून जनतेने चेअरमन मारुतीराव मोळावडे व त्यांच्या जन सहकार निधीवर विश्वासार्हता दृढ केली व त्याची पोचपावती म्हणजे अनेक कोटींच्या ठेवी ठेवून जनतेने विश्वास व्यक्त केला‌ अल्पावधीत ही संस्था जनतेच्या विश्वासाला पात्र ठरली याचे सर्व श्रेय चेअरमन मारुतीराव मोळावडे व त्यांचा सहकारातील अभ्यास व नियोजन त्याचबरोबर त्यांच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे परिश्रम होय.

संपूर्ण देशावर दीड वर्ष कोरोनाचे महाभयानक संकट होते त्यावेळी सर्व उद्योगधंदे लॉकडाऊन मुळे बंद होते, सर्व व्यवहार ठप्प होते अशा अडचणीच्या काळात सुद्धा खातेदारांना दिलासा देण्याचे, आधार देण्याचे महत्वपूर्ण कार्य जन सहकार निधीने केले. सहकारातील अनेक आर्थिक आव्हानं समोर असतानाही त्या आव्हानांना सामोरे जावून संस्था भक्कम पणे उभी केली. संस्थेचा पारदर्शक कारभाराने सर्वांची मने व विश्वास जिंकून सहकाराचे नियम तंतोतंत पाळून कारभार करून स्थापनेपासून ऑडिट वर्ग 'अ' ठेवण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.  

पतसंस्था म्हणजे ठेवी जमा करणे व कर्ज देणे एवढ्यावरच न थांबता चेअरमन मोळवडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य जनतेसाठी गरजू आणि सर्वसामान्य जनते करिता विविध सामाजिक उपक्रम राबवले यामध्ये रक्तदान शिबिर, पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात दिला‌ कुपोषित बालकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली. ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप केले.असे विविध सामाजिक उपक्रम राबवून जनमानसात आपली एक वेगळी प्रतिमा जन सहकार निधी ने निर्माण केली. अशा या बँकिंग, सहकार व सामाजिक बांधिलकी जपणार्‍या या संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण, सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या यामध्ये पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव देसाई, माजी सभापती रघुनाथराव जाधव, राजे संघर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष योगेशजी पाटणकर, शिवदौलत बँकेचे संचालक मधुकर पाटील, करपेवाडी चे सरपंच रमेश नावडकर शिद़ुकवाडीचे माजी सरपंच तात्यासो डुबल, तळमावले चे उपसरपंच अंकूश आतकरी,खळे गावचे माजी सरपंच भुजंगराव कचरे, कुठरे विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन शांताराम मोरे, पोतले गावचे सरपंच संदीप पाटील, मुख्याध्यापक दिलीप पाटील, धामणी चे माजी सरपंच बाजीराव सावंत, ज्ञानदेव आचरे माजी सरपंच आचरेवाडी, पत्रकार संदीप डाकवे, मुंबई पोलीस राहुल मोरे, तळमावले चे माजी सरपंच शांताराम ताईगडे, ॲड. अविनाश जानुगडे, उद्योजक मिलिंद शेठ लखापती, इक्बाल भाई सुतार, राजूभाई पटेल, तांबोळी तसेच विभागातील पत्रकार, ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी, सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांनी वर्धापनदिना निमित्त संस्थेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.